Home /News /mumbai /

मुंबईत चक्क केक आणि पेस्ट्रीतून ड्रग्जचा पुरवठा; NCBचा बेकरीवर छापा, महिलेसह तिघांना अटक

मुंबईत चक्क केक आणि पेस्ट्रीतून ड्रग्जचा पुरवठा; NCBचा बेकरीवर छापा, महिलेसह तिघांना अटक

NCB busted drug racket: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आणखी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई, 13 जून: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत आणखी एक मोठी कारवाई करत ड्रग्ज पुरवठा (Drug) करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हे चक्क बेकरीच्या माध्यमातून ही  करत होते. बेकरीत बनवण्यात येणाऱ्या केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून त्याचा सप्लाय (Drug supply from cake, pastry) सुरू होता. अखेर याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी छापा टाकत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात बेकरी सुद्धा सुरू होती. त्याच दरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून सप्लाय होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील मालाड (Malad, Mumbai) परिसरातील बेकरीवर छापा टाकला. Facebookवर अनोळख्या व्यक्तीसोबत मैत्री करणं पडलं महागात घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 160 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एनसीबीने एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये. या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे. सुशांतच्या मृत्यू नंतर ड्रग्ज तस्करांवर कारवाई अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होऊन आता वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतच्या मृत्यू नंतर समोर आलेला ड्रग्ज अँगल आणि त्यानंतर एनसीबीची सुरू असलेली कारवाई ही अद्यापही सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कारवाया करत तस्करांना गजाआड केलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Drug case, Mumbai, NCB

पुढील बातम्या