NCBची सर्वात मोठी कारवाई, आता थेट दाऊदच्या 'राईट हॅण्ड'लाच ठोकल्या बेड्या

NCBची सर्वात मोठी कारवाई, आता थेट दाऊदच्या 'राईट हॅण्ड'लाच ठोकल्या बेड्या

मुंबई NCB ने मुंबई पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावरच असलेल्या दाऊदच्या जन्मभूमीत डोंगरी येथे अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आणि सगळ्यांचे धाबे दणाणले होते.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : मुंबई NCB ने पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. मुंबईत दाऊदची सावली म्हणून ओळखला जाणारा आणि NCB कारवाई दरम्यान फरार झालेला आरीफ भुजवाल्याच्या NCB ने मुसक्या आवळल्या आहेत. बिळात लपून बसलेल्या या भूजवाला याला शोधून काढत NCB ने त्याचे आणखी दोन अड्डे देखील उद्धवस्त केले आहेत.

दाऊदचे मुंबईतील साम्राज्य संपले असून आता दाऊदची मुंबईत काहीच दहशत नाही असा दावा अनेक यंत्रणांनी केला होता. मात्र मुंबई केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच मुंबई NCB ने मुंबई पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावरच असलेल्या दाऊदच्या जन्मभूमीत डोंगरी येथे अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आणि सगळ्यांचे धाबे दणाणले होते. कारण NCB ने केलेल्या कारवाईत डोंगरी भागात सुरू असलेली डी कंपनीची ड्रग्सची फॅकट्री उद्धवस्त करत तब्बल 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, एक परदेशी बनावटीची पिस्तुल, बेनामी संपत्तीचे कागदपत्रे, दोन कोटी 80 लाख रुपये रोख आणि महागड्या गाड्या सापडल्या होत्या.

धक्कादायक म्हणजे डोंगरी भागातील नूर मंजील येथील या ड्रग्सच्या फॅक्ट्रीत अंमली पदार्थ बनवले जायचे. NCB ने जेव्हा या नूर मंजीलवर धाड टाकली तोच डी कंपनीचा खासम खास आरीफ भूजवाला पाचव्या माळ्यावरुन छुप्या मार्गाने फरार झाला. पण NCB ने त्याचा पिछा सोडला नव्हता. शेवटी आज त्याली एनसीबीने रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे.

हेही वाचा - मुंबईच्या रस्त्यावर थरारक पाठलाग, मोबाईल चोराला अखेर केलं जेरबंद

आरीफ भूजवाला याच्या अटकेने डी कंपनीला तर मोठा धक्का बसलाच आहे, पण दाऊदला व्यक्तीगत मोठा हादरा बसला आहे. कारण डोंगरी म्हणजे दाऊद आणि दाऊद म्हणजे डोंगरी हे जसं समीकरण आहे, तसंच दाऊदची सावली आणि मुंबईतील प्रतिदाऊद म्हणजे आरीफ भूजवाला असं समीकरण होतं. त्यामुळे आरीफ भूजवालाची अटक ही मोठी कारवाई बोलली जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 25, 2021, 11:33 PM IST

ताज्या बातम्या