Home /News /mumbai /

Mumbai Drugs Smuggling : NCB ची मोठी कारवाई, 50 लाखांचे ड्रग्ज जप्त, नायजेरीयन नागरिकासह तिघांना अटक

Mumbai Drugs Smuggling : NCB ची मोठी कारवाई, 50 लाखांचे ड्रग्ज जप्त, नायजेरीयन नागरिकासह तिघांना अटक

Mumbai Drugs smuggling NCB action हार्डवेअर पार्ट मध्ये तब्बल आठ पॅकेट मधून 2221 अमली पदार्थ भरलेल्या कॅप्सूल पाठवण्यात येत होत्या. हार्डवेअर पार्टमधील पोकळीत लपून त्याची तस्करी केली जात होती.

मुंबई, 29 मे : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटनं संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhade) यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या रॅकेटचा (Drugs Racket) पर्दाफाश केला. तब्बल 50 लाख रुपयांचे अमली पदार्थ (Drugs worth 50 lakh) जप्त करण्यात आले आहेत. अनोख्या पद्धतीनं ही टोळी अंमली पदार्थांची तस्करी करत होती. हार्डवेअर पार्टबरोबर या अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. कोरोनासंकटामुळं विमान प्रवास शक्य नसला तरी शक्कल लावून ही टोळी तस्करी करत होती. (वाचा-नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत कुपोषित वाढले, पण पोषण केंद्रांकडे फिरवली पाठ) एका नायजेरियन नागरिकानं मीरा रोडमधून अंमली पदार्थाचे पॅकेट तयार केले होते. यारा कॅट मार्फत कोट्यावधी रुपयांचे हे अंमली पदार्थ आखाती देशात कतारला पाठवले जाणार होते. मुंबईतील एक खाजगी व्यक्ती त्याचबरोबरीने मीरा रोड येथील एक कुरिअर कंपनी काम करणारा व्यक्ती यांची टोळी या नायजेरियन नागरिकानं तयार केली होती. या कुरियर कंपनीमार्फत विविध हार्डवेअर किंवा अनेक वस्तू आखाती देशात पाठवल्या जातात. त्यांचा फायदा घेऊन हार्डवेअर पार्ट मध्ये तब्बल आठ पॅकेट मधून 2221 अमली पदार्थ भरलेल्या कॅप्सूल पाठवण्यात येत होत्या. हार्डवेअर पार्टमधील पोकळीत लपून त्याची तस्करी केली जात होती. (वाचा-"उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं") एकाच वेळी विविध हार्डवेअर पार्ट मध्ये लाखो रुपयांचे अमली पदार्थ सोप्या मार्गे आखाती देशात तस्करी करून पाठवले जायचे. या सर्व रॅकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार समीर वानखेडे यांनी पाळत ठेवण्याकरता एका विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाला तस्करीची हालचाल लक्षात येताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं नायजेरियन नागरिकासह तिघांना ताब्यात घेतलं. त्यांनी चौकशीत अनेक आखाती देशांत कोट्यावधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचं कबूल केलं. मीरा रोड येथे नायजेरियन नागरिकांचं अनधिकृत वास्तव्याचं प्रमाण वाढलं आहे. बहुतांश नायजेरियन नागरिक अंमली पदार्थ तस्करीशी संबंधित आहेत. याठिकाणी जाऊन कारवाई करणं जवळपास अशक्य आहे. तरीही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं कारवाई केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Drugs, Mumbai News, NCB

पुढील बातम्या