• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Jan Ashirwad Yatra: नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा; शिवसेना-राणे समर्थक भिडणार?

Jan Ashirwad Yatra: नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा; शिवसेना-राणे समर्थक भिडणार?

Narayan Rane Jan Ashirwad Yatra: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. मुंबईतून या जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ होत आहे.

  • Share this:
मुंबई, 19 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) आजपासून सुरू होत आहे. मात्र, ही जन आशीर्वाद सुरू होण्यापूर्वीच वाद सुरू झाला आहे. नारायण राणे हे आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळापासून करत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करत नारायण राणे आपली जन आशीर्वाद सुरुवात करत आहेत. मात्र, नारायण राणे यांच्या या निर्णयाला शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध (Shiv Sena oppose) केला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) राजकीय राडा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्री झाल्यानंतर प्रथमच मुंबईत येत आहेत. त्यात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारने जनतेत जाऊन आशीर्वाद घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबईतून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करत असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्याच कारण म्हणजे राणे आणि ठाकरे कुटुंब यांचे आजवरचे राहिलेले संबंध आहेत. राणे आपल्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्याला शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळापर्यंत पोहोचू देणार नाही असा इशाराच दिला आहे.
शिवतिर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नाही. शिवसेनाप्रमुखांसोबत बेईमानी करणारा नेता महाराष्ट्रात दुसरा झालेला नाही. अशा माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्याचे अधिकार नाही आणि शिवसैनिक ते घेऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतरही नारायण राणे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यात सामना रंगणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. वरळी दौरा टाळला? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघात नारायण राणे यांनी जाणं टाळलं असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पूर्वीच्या शेड्युलमध्ये वरळी नाका येथे सभा आयोजित केली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं आहे.
First published: