'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात

'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात

सिरीयल रेपिस्टच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली असून, वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

  • Share this:

विजय देसाई, नालासोपारा, 22 सप्टेंबर : नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नवी मुंबईत आणि ठाण्यात धुमाकूळ घातलेला विकृत नराधम नालासोपाऱ्यात दाखल झाला असून त्याने एका मुलीचा विनयभंग तर दुसरीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. सिरीयल रेपिस्टच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली असून,  वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. तर कोणाला तो दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्वरित कळवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

सिरीयल रेपिस्ट विकृत नराधमास शोधण्यासाठी वसई विभागातील पोलीसांनी तीन पथके नेमली असून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, पोलिसांनी तो गेलेल्या वाटेवरील ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांना त्या विकृताने अजून कोणाला लक्ष करू नये म्हणून कंबर कसली असून त्यांनी शाळा,कॉलेज, नाके, चौका चौकात, सोसायट्यांमधील नागरिकात जनजागृती करणे सुरु केल आहे. रेल्वे स्टेशन, शहरातील चौका चौकात आरोपीच्या फोटो सहित तो कशा प्रकारच्या बतावण्या करतो ते त्यावर लिहिले आहे. पोलिसांनी जनजागृतीसाठी ८००० पत्रके छापली असून ४००० पत्रके वाटली आहेत.

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांना जर तुम्हाला चुकीच्या पद्धतीने काही करीत असेल अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही यासाठी सतर्क केले पाहिजे. अनोळखी व्यक्तीच्या आमिष प्रलोभनाला बळी पडू नये. अनोळखी व्यक्ती सोबत जावू नये अशी कोणी बतावणी करीत असेल तर लगेच त्या इसमा विषयी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सागर यांनी केले आहे.

सावधान! अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा 'तो' नराधम तुमच्याच परिसरात असू शकतो

बई आणि लगतच्या परिसरातल्या रहिवाशांनो सावधान! कारण अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा तो नराधम तुमच्याच परिसरात आहे. पोलिसांना सापडलेल्या सीसीटीव्हीत या नराधमी बलात्काऱ्याची छबी कैद झाली आहे. 4 दिवसात 2 अल्पवयीन मुलींवर याने बलात्कार केलेत. त्यामुळे नालासोपाऱ्यातल्या पालक, विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. पोलिसांनी शाळांनाही सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही देखील सावधान रहा.

पिडीत मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याचं रेखाचित्रे बनवण्यात आलंय. मुंबई, ठाणे, आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं, त्यातही हाच विकृत असल्याचं या पीडित मुलींनी ओळखलं आहे. पोलिसांनी त्याचे छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावले आहे. पालकांना आणि मुलांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नालासोपारा शहरतील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या विकृताचा युध्दपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. आम्ही शाळांमध्ये जाऊन शिक्षकांनी सावध केले आहे, तर शहरात या विकृताची छायाचित्रे असलेली पत्रके वाटून पालकांना सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत. मुलींनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडे जाऊ नये, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.

 VIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत

First published: September 22, 2018, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading