मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

चार महिन्यांचं बाळ जिवाच्या आकांताने रडतंय, बाप वेदनांनी व्हिवळतोय, नायर रुग्णालयात आता चौकशी होणार

चार महिन्यांचं बाळ जिवाच्या आकांताने रडतंय, बाप वेदनांनी व्हिवळतोय, नायर रुग्णालयात आता चौकशी होणार

संबंधित घटनेबाबत जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस दिसत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती भाजलेला आहे. तो वेदनांनी प्रचंड व्हिव्हळताना दिसतोय. त्याचबरोबर एक चार महिन्यांचं बाळ खूप जिवांच्या आकांताने रडतंय.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 30 नोव्हेंबर : वरळीतील कामगार वसाहतीमध्ये (Worli labor colony) एका घरात गॅस सिलेंडरचा (Cylinder blast) स्फोट होवून त्यात भाजलेल्या चार जणांना मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयामध्ये (Nair Hospital) उपचारासाठी आज दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची तत्काळ दखल घेत संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला (वय वय 25) आणि एक पुरुष (वय 27) असे चौघे जण भाजले आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगरपालिका अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे एका मंत्र्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता चौकशी करणार

तथापि, रुग्णालयात संबंधीत रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचे आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली आहे. त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

" isDesktop="true" id="637418" >

संबंधित घटनेबाबत जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस दिसत आहेत. व्हिडीओ बनवणारा व्यक्ती रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती भाजलेला आहे. तो वेदनांनी प्रचंड व्हिव्हळताना दिसतोय. त्याचबरोबर एक चार महिन्यांचं बाळ खूप जिवांच्या आकांताने रडतंय. या बाळाला देखील भाजलेलं दिसतंय. पण डॉक्टर, नर्सेस कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीय. या सगळा थरार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. संबंधित व्हिडीओ हा खरंच थरकाप उडवणारा असाच आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने रुग्णांना तासाभरापासून तसंच ताटकळत ठेवलं गेल्याचा आरोप केला आहे. आता याच व्हिडीओ प्रकरणी चौकशी होणार आहे.

First published: