मुंबईत आईची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे, दागिने विकून मैत्रिणीवर उधळले पैसे

मुंबईत आईची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे, दागिने विकून मैत्रिणीवर उधळले पैसे

मुलानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : घरात किरकोळ वाद झाल्यानंतर तो राग मनात ठेवून मुलानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच हत्या केल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी क्रूर मुलाने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते पाण्याने धुतले. त्यानंतर बाईकच्या साहाय्याने हे तुकडे मुंबईतील (Mumbai) विविध भागांत फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सोहेल शेख याला ताब्यात घेतलं आहे.

मुंबईतील विद्याविहार इथं 30 डिसेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असल्याने पोलिसांना अनेक दिवस महिलेची ओळख पटत नव्हती. मात्र याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. आईने फ्रीज वाजवणे बंद न केल्याचा राग मनात धरून मुलानेच आईची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

हत्येनंतर थर्टी फस्ट साजरा, दागिने विकून मैत्रिणीला दिले पैसे

आरोपी सोहेल शेख याने आईच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. तसंच दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत थर्टी फस्टही साजरा केला. त्यानंतर घरात असलेले दागिने विकून मैत्रिणीला पैसे दिल्याचं पोलिसांच्या चौकशीदरम्यान सोहेल शेख याने कबूल केलं आहे. जन्मदात्या आईची हत्या करून नंतर तरुणाने केलेल्या मौजमजेच्या या प्रकरणाने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

कसा झाला हत्येचा खुलासा?

विद्याविहारमधील नवल गेटसमोर 30 डिसेंबर रोजी एका महिलेचा बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह नजरेस आल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी याबाबतची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मात्र पोलिसांना जेव्हा सोमवारी या महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिचा एक पाय गायब होता. नंतर एका नाल्यामध्ये हा पायाचा तुकडा सापडला आहे. त्यानंतर पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मात्र मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकली नव्हती.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्र फिरवली. घाटकोपरमधील विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. या फुटेजमध्ये एक तरूण स्कूटरवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं पोलिसांच्या नजरेस आलं. याआधारे पोलीस सोहेल शेख याच्यापर्यंत पोहोचले. याप्रकरणी आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 10, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या