मुंबईच्या रस्त्यावर प्रेमाचा भयानक अंत, तरुणाने 22 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून केली हत्या

मुंबईच्या रस्त्यावर प्रेमाचा भयानक अंत, तरुणाने 22 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून केली हत्या

शहरातील मलाड परिसरातील इनफिनिटी मॉलजवळ ही घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 4 जानेवारी : मुंबईत भर रस्त्यावर तरुणाने 22 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. तसंच तरुणाने स्वत:लाही गोळी झाडून संपवलं आहे. शहरातील मलाड परिसरातील इनफिनिटी मॉलजवळ ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

इनफिनिटी मॉलजवळ रात्री 8 ते 9 च्या दरम्यान 25 वर्षीय तरुणाने अचानक फायरिंग सुरू केली. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या तरुणाने आधी 22 वर्षीय मुलीचा खून केला आणि त्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडल्या. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर गोळीबार करणाऱ्या तरुणानेही नंतर प्राण सोडले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाने या तरुणीची हत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र एकतर्फी प्रेमातून हा सगळा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सदर तरुण-तरुणीचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला आहे.

मृत तरुण-तरुणी कोण होते आणि नेमकी कोणत्या कारणातून ही घटना झाली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: January 5, 2021, 12:00 AM IST

ताज्या बातम्या