मुंबई 21 फेब्रुवारी : देशभरात मागील दोन आठवड्यात कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः राज्यात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होत आहे. अशात मुंबई महापालिकेनं (BMC) नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेनं विविध नियम पुन्हा एकदा लागू केले आहेत. अशातच आता मास्क (Mask) न लावणाऱ्या पबमधील 600 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases) पाहाता राज्य सरकार सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदीही केली होती. नाकाबंदी करत नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती केली. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बांद्रा परिसरात 5 पबमध्ये तपासणी करत मास्क न लावलेल्या तब्बल 600 लोकांचा दंड पब मालकांकडून वसूल केला आहे. तसंच पब मालकांवर गुन्हादेखील दाखल केला आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, पुढील आदेशापर्यंत याच प्रकारे कारवाई सुरू राहिल.
मास्क न वापरल्यानं पबमधील 600 जणांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई. पब मालकांना भरावा लागला दंड pic.twitter.com/4NNt6Z1Tfg
— News18Lokmat (@News18lokmat) February 21, 2021
देशामध्ये १०९७७३८७ कोरोना रुग्ण असून त्यातील १०६७८०४८ जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३१२७ इतकी आहे. या आजारातून १ कोटी ६ लाख ७८ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. तर मृत्युदरात घट होऊन ते १.४२ टक्के झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.