मुंबई पालिका भांडुप पोटनिवडणुकीत सेनेला धक्का, भाजपचा दणदणीत विजय

मुंबई पालिका भांडुप पोटनिवडणुकीत सेनेला धक्का, भाजपचा दणदणीत विजय

मुंबई महापालिकेच्या वाॅर्ड क्रमांक ११६ मधील पोट निवडणुकीत भाजपने बाजी मारलीये.मुंबई महापालिकेच्या वाॅर्ड क्रमांक ११६ मधील पोट निवडणुकीत भाजपने बाजी मारलीये.

  • Share this:

11आॅक्टोबर : मुंबई महापालिकेच्या वाॅर्ड क्रमांक ११६ मधील पोट निवडणुकीत भाजपने बाजी मारलीये. भाजपच्या उमेदवार जागृती पाटील विजयी झाल्या आहेत. सेनेच्या उमेदवार मिनाक्षी पाटील यांचा पराभव केलाय.

भांडुप पोट निवडणुकीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दाखवला होता. जवळपास निम्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी चुरस शिवसेना विरूद्ध भाजप उमेदवारांमध्येच होती.

भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांना ११,१२९ मतं पडली तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना ६,३३७ मतं पडली. भाजपच्या जागृती पाटील या तब्बल ४७९२ मतांनी विजयी झाल्यात.

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये अत्यंतं कमी अंतर आहे. त्यामुळे आपलं संख्याबळ अधिक मजबूत करण्यसाठी दोन्ही पक्षांनी आपली सर्व ताकत पणाला लावली होती. पण मतदार राजाने भाजपला पसंती दिलीये.

First published: October 12, 2017, 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading