Home /News /mumbai /

मुंबई पालिका 182 हॉटेल्सचा 22 कोटींचा मालमत्ता कर करणार माफ

मुंबई पालिका 182 हॉटेल्सचा 22 कोटींचा मालमत्ता कर करणार माफ

'कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबईतील हॉटेल्समधील सुमारे 5 हजार खोल्या कोविड योध्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.'

मुंबई, 29 ऑक्टोबर : कोरोनाच्या (Corona) काळात जीवाची बाजी लावून करणाऱ्या डॉक्टर, अधिकारी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवाऱ्याची व्यवस्था मुंबईतील (Mumbai) वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये (Hotels) करण्यात आली होती. त्यामुळे अशा 182 हॉटेल्सचा 22 कोटींचा कर माफ (Tax) करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) मांडला आहे. या प्रस्तावावरून वाद पेटण्याची चिन्ह आहे. मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाच्या परिस्थितीत अनेक वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत हजर होते. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडत होत्या. त्यामुळे पालिकेनं सभागृह, मैदानं, शाळा आदी ठिकाणी कोविड सेंटर उभारली होती. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबईतील हॉटेल्समधील सुमारे 5 हजार खोल्या कोविड योध्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या हॉटेल्समध्ये काही संशयित रुग्णांना देखिल कमी दरात खोल्या देण्यात आल्या होत्या. 'या' देशात वाढतोय कोरोनाचा सर्वाधिक धोक, पुन्हा एकदा केली लॉकडाऊनची घोषणा मुंबईतील एकूण 182 हॉटेल्सची यासाठी मदत घेण्यात आली होती. आता कोविड काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था केल्याबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. त्यामुळे या 182 हॉटेल मालकांना  कृतज्ञता पॅकेज देण्याचा प्रस्ताव मुंबई पालिकेनं ठेवला आहे. या हॉटेल्सचा 22 कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने स्थायी समितीसमोर आणला आहे. अख्खं पुणे झोपेत असताना मध्यरात्री उसळला आगडोंब, पाहा आगीचा भीषण VIDEO मुख्य म्हणजे, या सर्व हॉटेल मालकांना त्यांच्या रँकिंग नुसार आधीच तीन महिन्याचे भाडे मुंबई महापालिकेने दिले आहे. भाडेही द्यायचे आणि करही माफ करायचा ही कुठली कृतज्ञता असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. हीच कृतज्ञता सर्वसामान्य मुंबईकरांवर का दाखवली जात नाही असाही आरोप विरोधकांनी केला आहे. 'मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मुंबईकरांची कृतज्ञतापणा करत आहेत. हॉटेल मालकांनी कोविडच्या काळातही व्यवसाय केला. पण, मुंबईकर मात्र घरी बसून होता. नियमांचं पालन करणाऱ्या मुंबईकरांना स्क्वेअर फिट न बघता सरसकट करमाफी द्यावी, ही खरी कृतज्ञता ठरेल', अशी मागणीच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: मुंबई पालिका

पुढील बातम्या