मुंबई पालिकेचं त्रिभाजन करा, काँग्रेस आमदाराच्या मागणीमुळे विधानसभेत गोंधळ

मुंबई पालिकेचं त्रिभाजन करा, काँग्रेस आमदाराच्या मागणीमुळे विधानसभेत गोंधळ

कामकाज सोयीचं व्हावं या दृष्टीने मुंबई महापालिकेचं त्रिभाजन करावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी विधानसभेत केली.

  • Share this:

19 डिसेंबर : कामकाज सोयीचं व्हावं या दृष्टीने मुंबई महापालिकेचं त्रिभाजन करावं अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि चांदिवलीचे आमदार नसीम खान यांनी विधानसभेत केली. त्यानंतर विधानसभेत जवळपास सगळेच आमदार आक्रमक झाले. त्यानंतर विधानसभेचं कामकाज 10 मिनिटे स्थगित करण्यात आली.

कुठल्याही परिस्थितीत मुंबईचे तुकडे पडू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसेना-भाजप आमदारांनी जोरदार गदारोळ केला. कुर्ला पश्चिमेकडील पालिकेच्या हद्दीतील ‘एल’ वॉर्डच्या खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी लागलेल्या आगीत, तब्बल बारा कामगारांचा मृत्यू झाला. त्यामुद्यावर चर्चा सुरू असताना नसीन खान यांनी ही मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज तहकूब झाले.

First published: December 19, 2017, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading