हिंदी, मराठी सिनेमे वितरणाचं केंद्र असलेली 'नाझ' इमारत मुंबई महापालिकेकडून सील

हिंदी, मराठी सिनेमे वितरणाचं केंद्र असलेली 'नाझ' इमारत मुंबई महापालिकेकडून सील

मराठी, हिंदी, भोजपुरी सिनेमांच्या वितरणाचं मुख्य केंद्र असलेली ग्रँण्टरोडची नाझ इमारत मुंबई महापालिकेने सील केली आहे.

  • Share this:

01 एप्रिल : मराठी, हिंदी, भोजपुरी सिनेमांच्या वितरणाचं मुख्य केंद्र असलेली ग्रँण्टरोडची नाझ इमारत मुंबई महापालिकेने सील केली आहे. या इमारतीचा मालमत्ता कर वेळच्या वेळी भरण्यात आलेला नाही. याशिवाय ही इमारत आता जुनी आणि जीर्ण झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत आहे.

याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यात काहीही दुरूस्तीकाम करण्यात आलेलं नाही. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही बिल्डींग सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

या इमारतीतूनच राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात सिनेमे वितरित केले जातात. मराठीतील अनेक आघाडीच्या वितरकांची कार्यालयं याच इमारतीत आहेत. त्यामुळे या कारवाईचा फटका त्यांनाही बसण्याची शक्यता आहे.

 

First published: April 1, 2018, 10:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading