मुंबई महालिकेने 16 वर्षांपासून केली उधारी, महिला गटांचे 54 कोटी थकवले

मुंबई महालिकेने 16 वर्षांपासून केली उधारी, महिला गटांचे 54 कोटी थकवले

मध्यान्न भोजन पुरवणाऱ्या महिलांची बँकेत 60 हजार कोटींच्या ठेवी आहे पण 16 वर्षापासून ही ठेवी महानगर पालिकेकडून थकवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : मुंबई महानगर पालिका ही सगळ्यात श्रीमंत पालिका आहे. पण याच श्रीमंत पालिकेने महिलांचे चक्क 54 कोटी रुपये थकवले आहेत. मध्यान्न भोजन पुरवणाऱ्या महिलांची बँकेत 60 हजार कोटींच्या ठेवी आहे पण 16 वर्षापासून ही ठेवी महानगर पालिकेकडून थकवण्यात आली आहे. त्यामुळे महिला आता आक्रमक झाल्या असून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

खरंतर, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं. कामात प्रोत्साहन आणि प्राधान्य द्यावं अशा स्वरूपाचं साधारणपणे महिला धोरण असतं. पण देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेला मात्र असं काही वाटत नाही असचं चित्र दिसतं आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन पुरवणाऱ्या 254 महिला गटांना तरी तसाच अनुभव येत आहे.

2003 ते 2019 या सोळा वर्षांच्या कालावधीमध्ये बीएमसीनं या महिलांचे 54 कोटी रूपये थकवले आहेत. वेळोवेळी आठवण करुन देऊनही या महिलांना आजवर हे पैसे मिळाले नाहीत. त्यातही बील काढण्यासाठी अधिकाऱ्यांना द्यावे लगणारे पैसे यामुळे महिला संतापल्या आहेत. आठवड्याभरात आमचे पैसे द्या नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा या महिलांनी दिला आहे.

इतर बातम्या - ’आता प्रक्रिया लांबणार नाही, उद्धव ठाकरेंशिवाय राज्याला पर्याय नाही’

का अडकले पैसे?

मध्यान्न भोजनासाठी मुंबई महापालिका पैसे खर्च करत असली तरी त्याला पुणे शिक्षण विभगाची परवानगी लगते. या महिलांच्या थकवलेल्या पैश्यांच्या देण्याच्या संदर्भात पाठपुरावा केल्याचा दावा बीएमसीचा शिक्षण विभाग करतोय. तर आम्हाला असा पत्रव्यवहार झालाच नसल्याचं पुणे बोर्डाचं म्हणणं आहे. त्यामुळे महिलांची देणी पालिकेला देता आलेली नाही. आता मात्र, परवानगी मिळाली असून आठवड्याभरात महिलांची देणी त्यांना परत मिळतील असं पालिका प्रशासनानं म्हटलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 21, 2019, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading