नवं वर्ष सुरू होण्याआधीच नवी आशा, मुंबईत डॉक्टरांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण सुरू

नवं वर्ष सुरू होण्याआधीच नवी आशा, मुंबईत डॉक्टरांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण सुरू

कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि जगभरात लशीवर संशोधन सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : मुंबई महापालिकेच्या वतीने आजपासून डॉक्टरांना लसीकरण संदर्भात प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आहे. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि जगभरात लशीवर संशोधन सुरू आहे.

भारतातही लशीची मानवी चाचणी सुरू आहे. प्रत्यक्ष लोकांना लसीकरण करण्यासाठी अजून केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नाही. परंतु लवकरच लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्याच्या पूर्वतयारीमध्ये कोल्ड स्टोरेज आणि लसीकरणाचे प्रशिक्षण या दोन महत्त्वाच्या बाबी येत असल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही बाबतीत आपली तयारी सुरू केली आहे.

कोल्ड स्टोरेजसाठी जागा निश्चित झाली असून आजपासून प्रत्यक्ष लसीकरण प्रशिक्षण सुद्धा द्यायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने मुंबई महापालिकेतील आठ डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले होते. आता या आठ डॉक्टरांची टीम दीडशे डॉक्टरांना प्रशिक्षित करणार आणि त्यानंतर हे दीडशे डॉक्टर इतरांना प्रशिक्षित करणार आहेत. सुरुवातीला असे सुमारे 2000 डॉक्टर आणि नर्स प्रशिक्षित केले जाणार असून दीडशे डॉक्टरांच्या प्रशिक्षणाला पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे.

प्रत्येक दिवशी हे प्रशिक्षण सहा तास चालणार आहे. आज मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील कार्यालयात हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये लस वाहून आणणे, लसीकरण केंद्राची व्यवस्था, प्रत्यक्ष लसीकरण आणि लसीकरण केल्यानंतर अर्धा तास लसीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीला केंद्रात थांबावं लागणार आहे, त्याची व्यवस्था याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

मुंबई महापालिका सुरुवातीला आपल्या आरोग्य सेवकांना ही लस देणार आहे. जेणेकरून या लसीचे काही दुष्परिणाम दिसून आले तर हॉस्पिटलमध्ये लगेच उपचार करणे शक्य होईल. सुरुवातीला मुंबईची चार महत्त्वाची रुग्णालये के ई एम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालय त्याचबरोबर चार पेरिफेरल रुग्णालय इथं लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी काही जणांना प्रशिक्षित करावे लागणार आहे. त्यासाठीसुद्धा मुंबई महापालिकेने आपली तयारी सुरू केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 18, 2020, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading