मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /महाविकास आघाडीत बिघाडीचे चिन्ह, काँग्रेस नेत्याने दिला पुन्हा स्वबळाचा नारा!

महाविकास आघाडीत बिघाडीचे चिन्ह, काँग्रेस नेत्याने दिला पुन्हा स्वबळाचा नारा!

'लोकसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्यात आली होती 500 sq फूटच्या खालील घरांना मालमत्ता करात सूट दिली जाईल'

'लोकसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्यात आली होती 500 sq फूटच्या खालील घरांना मालमत्ता करात सूट दिली जाईल'

'लोकसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्यात आली होती 500 sq फूटच्या खालील घरांना मालमत्ता करात सूट दिली जाईल'

मुंबई, 06 जानेवारी : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (mumbai municipal election) पुढच्या वर्षी होणार आहे. मात्र, आतापासून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्याच्या  सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेसने (Congress) मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagatap) यांनी 'माझा आजही वेगळे लढण्याबद्दल विचार आहे आणि 100 दिवसांनंतर सुद्धा तोच  विचार असणार आहे' असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद होण्याची चिन्ह आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. 'आगामी महापालिका निवडणुकीमध्ये  माझा आजही विचार वेगळे लढण्याचा आहे आणि  100 दिवसांनंतर मला जर पुन्हा विचारले तर  तोच निर्णय असणार आहे आणि महापालिकेची निवडणूक येईपर्यंत माझा विचार तोच असणार आहे', असं भाई जगताप यांनी ठामपणे सांगितले.

कोरोनामुळे मरणाच्या दारात पोहचलेल्या व्यक्तीचं आपल्या पत्नीला भावुक पत्र

'लोकसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्यात आली होती 500 sq फूटच्या खालील घरांना मालमत्ता करात सूट दिली जाईल. 6 जुलै 2017 च्या दिवशी हा ठराव निघाला होता.  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सेम जीआर काढला, त्यात काहीच बदल नव्हता. आता देखील जो जीआर आहे त्यातही 8 ते 9 भाग आहेत. एकच जनरल कर त्यात माफ केला.  100 रुपये जर कर असेल तर फक्त 10 रुपये माफ केला आहे. त्यामुळे जुलैमध्ये निघालेला GR पूर्ण लागू करावा, अशी मागणी भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कॉंग्रेस पक्षातील 11 आमदार NDA च्या वाटेवर? कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

'बोरिवलीच्या पूर्वेला ओंकारेश्वर मंदिर जवळ स्कॉय वॉक बांधला जातोय, तिथले लोक विरोध करत आहे. तो बांधण्यासाठी माझा प्रश्न आहे. मुंबईत जेवढे बनवले ते किती वापरले जातात हा संशोधनाचा प्रश्न आहे. मुळात स्कॉय वॉकचा  गैर वापर अधिक होत आहे.  92 कोटी रुपयांचा हा स्कॉय वॉक बनवण्याचा काय उद्देश आहे पालिकेचा? आधी तिथला सर्वेह करावा लोकांचे पैसे वाया जाऊ नये', अशी टीकाही जगताप यांनी केली.

ती काळरात्र ठरली; भरधाव ट्रेलरखाली चिरडून 3 जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO

'मुंबईच्या झोपडीधारकांना मोफत पाणी मिळावं अशी काँग्रेसची मागणी आहे.  प्रत्येक महिन्याला 500 कोटी रुपये महसूल करातून मिळत असतो. 62 टक्के झोपडपट्टीत राहणारे नागरिक आहे, त्याला मोफत पाणी दिला तर 172 कोटींचा बोजा पडेल', असंही जगताप म्हणाले.

First published: