मुंबई पालिकेतल्या भूखंड रॅकेटचा पर्दाफाश : 500 कोटींचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न!

मुंबई पालिकेतल्या भूखंड रॅकेटचा पर्दाफाश : 500 कोटींचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न!

आरक्षित भुखंडाच्या फाईलवरील शेऱ्यात छेडछाड प्रकरणाच्या आरोपाखाली महापालिकेच्या लिपीकाला अटक करण्यात आलीय.

  • Share this:

अक्षय कुडकिलवार, मुंबई,ता.18 जून :आरक्षित भुखंडाच्या फाईलवरील शेऱ्यात छेडछाड प्रकरणाच्या आरोपाखाली महापालिकेच्या लिपीकाला अटक करण्यात आलीय. जोगेश्वरीतील वादग्रस्त भुखंडाच्या आरक्षण फाईलवर चक्क आयुक्तांचा शेराच बदलण्यात आलाय. या वादग्रस्त भूखंडाची किंमत 500 कोटी इतकी आहे.

वादग्रस्त भुखंडाबाबत हायकोर्टानं वर्षभरात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यावर आयुक्तांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासंदर्भातील शेरा मारला होता. मात्र वर्षभरानंतर आयुक्तांच्या शेऱ्यात बदल करुन सुप्रीम कोर्टात जावू नये असा शेरा आढळून आला. प्रकरणात गडबड झाल्याचं लक्षात आल्यानंतर पालिकेनं आझाद मैदान पोलिसात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी कारवाई करत लिपीक स्वप्नील पुराणिकला अटक केलीय. तसंच याप्रकरणातील इतर आरोपींची नावं पुढीलप्रमाणे आहेत. ज्ञानप्रकाश शुक्ला, निखिल ज्ञानप्रकाश शुक्ला, प्रभाकर शुक्ला, ब्रम्हदेव पांडे, सुभाष वाल्मिकी, शिपाई अशी नावं आहेत.

हेही वाचा...

 राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, मित्रपक्षांशी बोलून मुख्यमंत्री घेणार निर्णय -मुनगंटीवार

 'होम मिनिस्टर'चे लाडके भाऊजी झाले 'मिनिस्टर' !

 परशुराम वाघमारेचा ताबा कर्नाटक एसआयटीनं महाराष्ट्र एसआयटीला नाकारला

 साताऱ्यात बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने एकाच मंचावर आले उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे

 कुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का?, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचं वक्तव्य

First published: June 18, 2018, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading