भांडुपच्या विजयामुळे भाजप सेनेच्या खुर्चीजवळ, सत्तेचं समीकरण बदलणार ?

भांडुपच्या विजयामुळे भाजपचं संख्याबळ आता 85 वर पोहोचलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2017 04:18 PM IST

भांडुपच्या विजयामुळे भाजप सेनेच्या खुर्चीजवळ, सत्तेचं समीकरण बदलणार ?

12 आॅक्टोबर : मुंबई महापालिकेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारलीये. या विजयामुळे महापालिकेतली समीकरणं बदलणार आहे.

भांडुपच्या विजयामुळे भाजपचं संख्याबळ आता 85 वर पोहोचलंय. सध्या भाजपचे निवडून आलेले नगरसेवक ८२ आहे आणि २ अपक्षांचा पाठिंबा मिळून ८४ जागा झाल्यात. आज भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्यामुळे भाजपचं संख्याबळ  ८५ वर पोहोचलंय.

सध्या शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक ८४ असून ४ सहयोगी अपक्षांचा पाठिंब्यावर ८८ संख्याबळाचा आकडा आहे.

यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे हे अपात्र ठरतील, मात्र त्याठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या ८८ हीच राहणार आहे.

दरम्यान, भांडुपच्या या विजयावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेनेवर सडकून टीका केलीये.  पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोटफाडून हा भाजपाचा विजय आहे. या पोटनिवडणुकीतही भाजपलाच मुंबईकरांची साथ आहे असा खोचक टोला शेलार यांनी सेनेला लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...