गायनेशियम म्हणजे काय?, भावी सफाई कामगारांना बीएमसीचा सवाल

या परीक्षेत विचारण्यात आलेले 'हे' काही प्रश्न

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2018 02:44 PM IST

गायनेशियम म्हणजे काय?, भावी सफाई कामगारांना बीएमसीचा सवाल

15 मार्च : दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या सफाई कामगारांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाते. पण या परीक्षेत सफाई कामगारांना चक्क युपीएससीचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. दरम्यान, या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. विधानपरिषदेत आमदार भाई गिरकर यांनी ही मागणी केलीये.

आधीच सफाई कामगारांच्या भरतीसाठी दहावी पास असल्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यात असे अवघड प्रश्न विचारुन मुंबई महापालिकेने अकलेचे तारे तोडलेत असं म्हणायला हरकत नाहीये.

या परीक्षेत विचारण्यात आलेले 'हे' काही प्रश्न 

- भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण?

- ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?

Loading...

- गायनेशियम म्हणजे काय?

- सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे?

- लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगरमध्ये काय असते?

- फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा पराग कणांच्या होणाऱ्या पराग सिंचनास काय म्हणतात?

- निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे २००० आणि २७५० गुंतवणूक करून एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला त्यांच्या परिणामी १२ महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये १२:११ या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती?

- ७२ कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी ६ सेंकदात एक पोल ओलांडते ही आगगाडी ४८० मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?

या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तरी माहित आहेत का? नाही ना, मग 10वी पास असणारे सफाई कामगार तरी ही परीक्षा कसे देणार? खरंतर याचा विचार महापालिकेने प्रश्नपत्रिका तयार करण्याआधी करायला हवा होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2018 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...