मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: आता तरी सुधरा रे! दारुपार्टी करणाऱ्या 25 तरुण-तरुणींना मुंबईत अटक, कोरोनाचे नियम धाब्यावर

VIDEO: आता तरी सुधरा रे! दारुपार्टी करणाऱ्या 25 तरुण-तरुणींना मुंबईत अटक, कोरोनाचे नियम धाब्यावर

महाराष्ट्रातून (Coronavirus Cases in Maharashtra)आणि खासकरून मुंबईतून (Mumbai COVID-19 Update) येणारी कोव्हिड-19 ची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

रमाकांत तिवारी, मुंबई, 05 एप्रिल: दिवसेंदिवस कोरोनाची (Coronavirus Pandemic) परिस्थिती भयावह बनत चालली आहे. महाराष्ट्रातून (Coronavirus Cases in Maharashtra)आणि खासकरून मुंबईतून (Mumbai COVID-19 Update) येणारी कोव्हिड-19 ची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. त्यातच अद्याप अनेकांना शहाणपण आल्याचे दिसत नाही आहे. मुंबईतील अनेक भागात पार्टी, दारु पार्टी, हुक्का यांसारखे प्रकार सुरूच आहेत. या सर्व पार्ट्यांकरता एकत्र जमून अनेकजण आपल्याबरोबर इतरांचंही आयुष्य धोक्यात घालत आहेत. अशाच एका पार्टीतून मुंबई पोलिसांनी 25 तरुण-तरुणींना अटक केली आहे. हुक्का लाउंजमध्ये पार्टी करणं या तरुण-तरुणींना भारी पडलं आहे.

मुंबईतील मुलुंडमध्ये हा प्रकार घडला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तरुण-तरुणींना अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण सध्या वाढते आहे, याच पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे. या परिसरात या तरुणांची हुक्का लाउंजमध्ये दारु, सिगरेट आणि हुक्का पार्टी सुरू होती. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून 25 जणांना अटक केली आहे.

पाहा घटनेचा VIDEO:

पोलिसांनी छापा टाकत या तरुण-तरुणींना अटक केली आहे. मुलुंड पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, मुलुंडमधील एका पबमध्ये काही तरुण-तरुणी लॉकडाऊन असून देखील (रात्री 8 नंतर) हुक्का आणि दारु पित होते. पोलिसांनी माहिती मिळताच मुलुंड पोलिसांच्या टीमने भूमरो नावाच्या एका पबवर छापा टाकला.

(हे वाचा-पुढच्या दोन आठवड्यात होणार कोरोनाचा महाउद्रेक! शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा)

छाप्यादरम्यान मुंबई पोलिसांच्या पथकाला असे आढळून आळे की, रात्री 8 वाजल्यानंतर कलम 144 अन्वये नाइट कर्फ्यू लावूनही पबमध्ये मुलं-मुलींना दारू, सिगरेट आणि हुक्का दिलं जात होतं. पोलिसाना मिळालेली माहिती खरी ठरली आणि त्यांनी ही कारवाई केली.

First published: