• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रेल्वेखाली आत्महत्या करायला गेलेल्या आईचा मुलीने असा वाचवला जीव
  • VIDEO: रेल्वेखाली आत्महत्या करायला गेलेल्या आईचा मुलीने असा वाचवला जीव

    News18 Lokmat | Published On: Nov 30, 2018 01:14 PM IST | Updated On: Nov 30, 2018 01:44 PM IST

    स्वाती लोखंडे, प्रतिनिधी मुंबई, 30 नोव्हेंबर : मुंबईतील जोगेश्वरीत धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने लोकलखाली आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. पण यावेळी या महिलेच्या मुलीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने या महिलेचा जीव तर वाचला पण तिला आपला एक हात गमवावा लागला आहे. आपल्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ही मुलगीही जखमी झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज१८ लोकमतच्या हाती आलं आहे. ज्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतय की नेमकी काय घटना घडली. बुधवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली आहे. दोघींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी