Home /News /mumbai /

Weather Update: महाराष्ट्र पावसाची दमदार हजेरी, मुंबईसह या शहरांमध्ये मुसळाधार पावसाची शक्यता

Weather Update: महाराष्ट्र पावसाची दमदार हजेरी, मुंबईसह या शहरांमध्ये मुसळाधार पावसाची शक्यता

पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात पावसाळ्याची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ते मुसळधार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

    मुंबई, 15 जून : उन्हामुळे हैराण झालेले मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्याची वाट पाहत आहेत. अशात रविवारी झालेल्या पावसामुळे उष्ण वातावरणातून लोकांना थोडासा दिलासा मिळाला. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात पावसाळ्याची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ते मुसळधार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे मान्सूनने देशातील बहुतेक पश्चिम आणि मध्य भागात दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात पाऊस वेगाने पुढे जाणं अपेक्षित असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. मुंबईत पावसाने जोर धरला आहे, त्यामुळे आज किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे कोव्हिडि रुग्णालयात शिरलं पाणी रविवारी महाराष्ट्रात अनेक भागात चांगलाच पाऊस झाला. अचनाक आलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. अशात जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे कोव्हिड रुग्णालयाच्या तळ मजल्यात पाणी शिरल्याचं समोर आलं. रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तळ मजल्यावर 12 रूग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात पोहोचला पाऊस चार दिवस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकरत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मान्सूनची प्रगती सामान्य व अपेक्षेनुसार झाली आहे. मात्र, नाशिकसह काही शहरी भागात मुसळधार पावसामुळे लोकांची गैरसोय झाली. मुसळधार पाऊस पडल्यानंतर शनिवारी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं. राज्यात मान्सून दाखल झाल्यानं अनेक भागांमध्ये भातशेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा मान्सून चांगला होईल असा अंदाजही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मान्सूनचा दक्षिणेकडून पश्चिमेकडे प्रवास सुरू आहे. मान्सूनचा आतापर्यंत रत्नागिरीतील हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया येथेपर्यंत प्रवास झाला आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील सर्व भागात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत साधारण 9-10 जूनला मान्सून दाखल होत असतो. यंदा मात्र, मान्सूनला मुंबईत पोहोचण्यास 3-4 दिवस विलंब झाला आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या