Home /News /mumbai /

Mumbai monsoon Rain : मुंबई अवघ्या काही तासांच्या पावसाने तुंबई, मुंबईसह उपनगरात तब्बल 256 मिमी पावसाची नोंद

Mumbai monsoon Rain : मुंबई अवघ्या काही तासांच्या पावसाने तुंबई, मुंबईसह उपनगरात तब्बल 256 मिमी पावसाची नोंद

राज्यात अनेक भागात पावसाने (Maharashtra monsoon rain) दडी मारली होती. दरम्यान मुंबई (Mumbai rain) आणि उपनगरातही पावसाची प्रतिक्षा होती.

  मुंबई, 01 जुलै : मागच्या कित्येक दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने (Maharashtra monsoon rain) दडी मारली होती. दरम्यान मुंबई (Mumbai rain) आणि उपनगरातही पावसाची प्रतिक्षा होती. मुंबईत दमट वातावरण असल्याने उष्णतेच्या (Mumbai heat wave) प्रमाणात वाढ झाली होती. मुंबईकरांना पावसाची आस लागून राहिली होती. काल दिवसभरात मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईकरांना पावसाचा मनमुराद आनंद लुटता आला. झालेल्या एका दिवसाच्या पावसाने मुंबईची तुंबई (Mumbai heavy rain)झाली यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान नव्या सरकारला तुंबलेल्या मुंबईत वाट काढत जावं लागल्याची चर्चा मात्र जोरदार रंगली होती. (Mumbai monsoon rain)

  काल (दि.30) मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटींग केली. काल सकाळपासून सुरू झाले पाऊस रात्री 8 पर्यंत कोसळत होता, 12 तासात तब्बल 119 मिमी पावसाची नोंद झाली. नेहमीप्रमाणे हिंदमाता, सायन मार्केटसह सखल भागात पाणी तुंबल्याने नागरिकांना या भागात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला. सांताक्रूझ येथे सिग्नलमध्ये बिघाड तर परेल स्टेशन जवळ रेल्वे मार्गात पाणी आल्यामुळे रात्री 9 नंतर मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचा विषय, विशेष अधिवेशनाचा निर्णय

  मुंबई शहर व उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून पडलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे शहर विभागातील हिंदमाता व सायन गांधी मार्केटसह सुमारे 15 ते 20 ठिकाणी सकल भागात पाणी तुंबले. पश्चिम व पूर्व उपनगरातही मिलन, अंधेरी सबवे, बांद्रा पवई, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे निचरा करण्यात आला.

  पावसाच्या संताधारणामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेगही मंदावला. त्यामुळे संध्याकाळी मुंबई शहराकडून उपनगरात जाणारे सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. चर्चगेट ते ऑपेरा हाऊसपर्यंत जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडवर ऑपेरा हाऊस ते चर्चगेट पर्यंत वाहनांची रांग लागली होती. राणीबाग ते सायन डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, लिंक रोड, बांद्रा लिंक रोड, एस. व्ही. रोड, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतूक कोंडी होती. 

  हे ही वाचा : 'देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, हा तर आश्चर्याचा धक्का', शरद पवारांनी डिवचलं

  मुंबईतील विविध शहरात झालेल्या पावसाची नोंद : मलबार हिल 100 मिमी, ग्रँट रोड 87 मिमी, भायखळा, मुंबई सेंट्रल- 82 मिमी, दादर - 95 मिमी, चंदनवाडी- 98 मिमी

  पूर्व उपनगर : मुलुंड परिसरात 58 मिमी, कुर्ला- 52 मिमी, घाटकोपर 46 मिमी, चेंबूर - 43 मिमी

  पश्चिम उपनगर : वांद्रे परिसरात 82 मिमी, वर्सोवा 64 मिमी, अंधेरी (पूर्व ) – 60 मिमी, सांताक्रूझ - 58 मिमी आणि विलेपार्ले 57 मिमी. 

  सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत पाऊस : शहर- 119.09 मिमी, पूर्व उपनगरात - 58.40 मिमी पश्चिम उपनगर - 78.69 मिमी.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Mumbai, Mumbai rain, Rain fall, Weather forecast, Weather warnings

  पुढील बातम्या