मोनोरेलची सेवा तांत्रिक बिघाडामुळं ठप्प

मोनोरेलची सेवा तांत्रिक बिघाडामुळं ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल ठप्प झाली आहे.

  • Share this:

मुंबई, मनोज कुलकर्णी, 10 एप्रिल : मोनोरेलच्या मागे लागलेलं विघ्न अद्याप देखील कायम आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं मोनोरेलची सेवा ठप्प झाली आहे. वडाळ्याजवळ हा बिघाड झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, सेवा सुरळीत होण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. त्यामुळे मोनोरेलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. मोनोरेलची सेवा खंडीत होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोनोरेलची सेवा खंडीत झालेली होती. आज पुन्हा देखील मोनोरेलची सेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.


VIDEO: विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट जेवण, मनसैनिकांनी आचाऱ्याच्या लगावली कानशिलात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 10:44 AM IST

ताज्या बातम्या