S M L
  • VIDEO : मोडक सागर व्होवरफ्लो, दोन दरवाजे उघडले

    Published On: Jul 15, 2018 06:38 PM IST | Updated On: Jul 15, 2018 06:42 PM IST

    मुंबई,ता. 15 जुलै : संततधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवढा करणाऱ्या महत्वाच्या धरणांपैकी मोडक सागरही पूर्ण भरला आहे. पाण्याची पातळी वाढली असल्याने 5 आणि 6 व्या क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे मात्र खासलच्या गावांना कुठलाही धोका नाही असं प्रशासनाने जाहीर केलं. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारात हे दरवाजे उघडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात संततधार सुरू आहे. पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली असून दिड महिन्यांचा पाऊस गेल्या सहा दिवसांमध्ये झाला आहे. या आधी महत्वाचं धरण असलेला तुळशी तलावही ओव्हरफ्लो झाला होता. मुंबईला पाणीपुरवढा करणीरी महत्वाची धरणं भरल्याने सध्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र आगस्ट- स्पटेंबर महिन्यांपर्यंत जर ही धरणं भरलेली राहिली तर उन्हाळ्यात मुंबईला पाणी टंचाई जाणवत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close