मुंबईत आमदार भाड्याने राहणार, सरकार देणार 1 लाख रुपये !

मुंबईत आमदार भाड्याने राहणार, सरकार देणार 1 लाख रुपये !

मनोरा आमदार निवासाचे काम होईपर्यंत मुंबईत भाड्याने राहण्यासाठी आमदारांना 50 हजारपासून एक लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जाणार आहे. आज विधीमंडळमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

  • Share this:

24 आॅक्टोबर : धोकादायक झालेल्या मनोरा आमदार निवासामधील आमदारांना आता मुंबईत भाड्याने रहाण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.

विविध समस्यांमुळे राहण्यास धोकादायक झालेले मनोरा आमदार निवास नोव्हेंबरपर्यंत रिकामे करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी घाटकोपर-चेंबुर मार्गावर पर्यायी तात्पुरत्या सदनिका देण्याचा निर्णय झाला होता.

मात्र, मंत्रालय तसंच रेल्वे स्टेशनपासून एवढ्या लांब रहायला जाण्यास बहुतांश आमदारांनी असमर्थतता दर्शवली होती. त्यामुळे मनोरा आमदार निवासाचे काम होईपर्यंत मुंबईत भाड्याने राहण्यासाठी आमदारांना 50 हजारपासून एक लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जाणार आहे. आज विधीमंडळमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

आमदारांसाठी मुंबईत निवासाकरता नरिमन पॉईंट इथल्या मोकळ्या जागेत टोलेजंग मनोरा आमदार निवास बांधण्यात आले होते. यामध्ये 158 आमदारांचे निवासस्थान आहे. प्रत्येक आमदाराला सुमारे 300 चौरस फूटपेक्षा मोठ्या दोन सदनिका देण्यात आल्या आहेत. मात्र अवघ्या 25 वर्षात या मनोरा आमदार निवासामध्ये अनेक समस्या पुढे यायला सुरुवात झाली.

प्लास्टर निघणे, स्वच्छतागृहातमध्ये पाणी गळती पासून अनेक समस्या पुढे आल्या. त्यातच इमारतीच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'मध्येही इमारत दुरुस्त करणे अवघड असल्याचं समोर आलं.

First published: October 24, 2017, 9:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading