मुंबईतील पश्चिम उपनगरात एका छोट्याशा खोलीत बसून ही टोळी नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीतून दूध काढून त्यात पाणी मिसळत होती. त्यानंतर लायटर, मेणबत्ती किंवा स्टोववर पिनेच्या सहाय्याने पुन्हा पिशवी सिलबंद करत होते. ही टोळी दूध भेसळ करुन पुन्हा पिशवीचं असं पॅकिंग करत होती जी पाहिल्यानंतर कुणालाही वाटणार नाही की पिशवीतील दूध भेसळयुक्त आहे. दुधाची पिशवी तपासून घ्या, मुंबईत अमुल आणि गोकुळच्या दुधात भेसळ करण्याचा भीषण प्रकार समोर घटनास्थळावरून पोलिसांनी गोकुळ आणि अमुल यासारख्या नामांकित कंपन्यांच्या पिशव्या सुद्धा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी छापा टाकून जवळपास 90 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत तीन आरोपींना अटक केली आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील वर्सोवा परिसरात छापा टाकून दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी तब्बल 294 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले होते आणि दोघांना अटक केली होती.मुंबईत दूध भेसळ टोळीचा पर्दाफाश#Mumbai #Milkadulteration #मुंबई pic.twitter.com/aWqMiNnKQ2
— News18Lokmat (@News18lokmat) June 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.