मुंबईत म्हाडाच्या लॉटरीचे आज निकाल

यंदा ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी ६५,१२६ अर्जदार पात्र ठरले आहेत.विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात आज सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येईल.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2017 09:03 AM IST

मुंबईत म्हाडाच्या लॉटरीचे आज निकाल

मुंबई, 10 नोव्हेंबर: बहुप्रतिक्षित म्हाडा लॉटरीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मुंबईतल्या एकूण 819 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. जवळपास 65 हजार 126 अर्जदार या लॉटरीसाठी पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात आज सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येईल.

यंदा ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी ६५,१२६ अर्जदार पात्र ठरले आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली या ठिकाणी आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिका आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर-गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाडनगर-मालवणी मालाड अशा २८१ सदनिका आहते. उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल-मुंबई, तुंगा-पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली-कांदिवलीत (पश्चिम) ३३८ सदनिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...