अरे देवा! मुंबई खड्ड्यात गेली, 10 वर्षात असा बसला 14 हजार कोटींचा फटका

अरे देवा! मुंबई खड्ड्यात गेली, 10 वर्षात असा बसला 14 हजार कोटींचा फटका

2005 ते 2015 या 10 वर्षांच्या काळात मुंबईचं 14 हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अहवाल युनायटेड स्टेटस ट्रेंड अँड डेव्हलपमेंट एजन्सी आणि केपीएमजीने राज्य सरकारला सोपवला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : दरवर्षी पावसाळयात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई होते. पावसाचं पाणी साचल्याने मुंबई महानगराला  गेल्या 10 वर्षात 14 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशातील बहुतेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये ही मुंबईमध्ये आहेत. इथून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. मात्र, पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई ठप्प होत असते. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडते. यामुळे 2005 ते 2015 या 10 वर्षांच्या काळात मुंबईचं 14 हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अहवाल युनायटेड स्टेटस ट्रेंड अँड डेव्हलपमेंट एजन्सी आणि केपीएमजीने राज्य सरकारला सोपवला आहे.

मुंबईत 26 जुलै 2005 ला पावसाने हाहाकार घातला होता. 24 तासात 944 मिमीहून अधिक पाऊस पडल्याने शहरात सर्वत्र पाणी साचलं होतं. तर हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत पाणी साचू नये म्हणून अनेक प्रकल्प हाती घेतले. त्यात मिठी नदीचे रुंदीकरण, ब्रिमस्टोव्हेड, पम्पिंग स्टेशन, पर्जन्य जलवाहिन्या मोठ्या करणे आदी प्रकल्प हाती घेतले. त्यानंतरही मुंबईत पाणी साचून ती ठप्प होत आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा, तातडीने घेणार शरद पवारांची भेट

2005 te 2015  या दहा वर्षात पुरामुळे झालेलं नुकसान

- मुंबईसह आसपास म्हणजेच मुंबई महानगरात 14 हजार कोटींच नुकसान

- 3000 लोकांचा मृत्यू

- 1 लाख 50 हजार लोक आजारी पडले

इतर बातम्या - 'भाऊ म्हणून दादा म्हणावं की...', मनसेच्या महिला नेत्याचा चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप

मुंबईत किंग सर्कल, हिंदमाता, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, सायन, चुनाभट्टी, मालाड, कांदिवली आदी ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहतूक ठप्प होती. रेल्वे सेवाही बंद होती. मिठी नदीचं काम अद्याप पूर्ण न झाल्याने मोठा पाऊस पडल्यावर याठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित करावं लागतं. रेल्वे ट्रॅकला लागून असलेले आणि ट्रॅक खालून जाणारे नाले पाण्याने भरून वाहू लागल्यावर रेल्वेची लोकल सेवा ठप्प होते. यामुळे मुंबईमधील व्यापारावर परिणाम होत आहे.

VIDEO: तरुण-तरुणीचा मोबाईल दुकानावर डल्ला, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या