'मेट्रो 4'चा विस्तार, ठाण्यापासून थेट सीएसटीपर्यंत !

'मेट्रो 4'चा विस्तार, ठाण्यापासून थेट सीएसटीपर्यंत !

प्रस्तावित मेट्रो चारचा टप्पा सीएसटीपर्यंत वाढवण्यात आला आहे

  • Share this:

03 एप्रिल : प्रस्तावित मेट्रो चारचा टप्पा सीएसटीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्याच्या कासारवडवलीपासून मेट्रोने थेट सीएसटीपर्यंत जाता येणार आहे.

वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या मेट्रो ४ चा पल्ला सीएसटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. वडाळापासून सुरू होणारी मेट्रो आता थेट सीएसटी रेल्वे स्थानकापासून सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रो ४ चा वडाळा ते जीपीओ असा सुमारे १० किमीचा पल्ला वाढवण्यात आलाय.

हा मार्ग हार्बर रेल्वे मार्गाला समांतर पी डिमेलो मार्गावरुन जाईल. तर घोडबंदर मार्गावर कासारवडवलीपर्यंत असलेली मेट्रो ४ ही गायमुखपर्यंत ५ किमीने वाढवत नेली जाणार आहे.

त्यामुळे घोडबंदर मार्गावरील आणखी मोठ्या लोकवस्तीला या मेट्रोचा फायदा होणार होईल. मेट्रो चार चा मार्ग दोन्ही बाजूंनी वाढवला गेल्याने भविष्यात थेट ठाणे ते सीएसटी असा मेट्रो प्रवास करता येणं शक्य होईल.

प्रकल्पाचा मुळ खर्च सुमारे १४,५०० कोटी होता. मार्ग वाढवल्याने खर्च आणखी ५ हजार कोटी रुपयांनी वाढणार मेट्रो ४ च्या नव्या मार्गाचा प्रकल्प आराखडा काही दिवसांत निश्चित होणार आहे.

अशी धावणार मेट्रो 4

वडाळा - ठाणे मेट्रो ४ चा मार्ग दोन्ही बाजूला वाढणार

वडाळा - घाटकोपर - तीन हात नाका ( ठाणे ) -कासारवडवली हा मेट्रो ४ चा मार्ग

वडाळा ते जीपीओ असा १० किमीचा मार्ग

कासारवडवली ते गायमुख असा सुमारे ५ किमीचा मार्ग

घोडबंदर रोड ते सीएसटी असा मेट्रो प्रवास शक्य होणार

प्रकल्पाचा मुळ खर्च सुमारे १४,५०० कोटी

मार्ग वाढवल्याने खर्च आणखी ५ हजार कोटी रुपयांनी वाढणार

First published: April 3, 2017, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading