• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • घरातून निघणार भुयार..जे पोहोचवेल तुम्हाला थेट मेट्रो स्टेशनवर!

घरातून निघणार भुयार..जे पोहोचवेल तुम्हाला थेट मेट्रो स्टेशनवर!

देशातील मेट्रो सेवा बंदच राहणार आहेत. मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात आली असली तरी, सामन्यांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही आहे.

देशातील मेट्रो सेवा बंदच राहणार आहेत. मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात आली असली तरी, सामन्यांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही आहे.

याबाबत मेट्रो 3 प्रशासन म्हणजेच एमएमआरसीएलने काही दिवासंपूर्वीच लोकांचा प्रतिसाद जाणून घेतला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

  • Share this:
मुंबई, 8 फेब्रुवारी : मेट्रो 3 म्हणजेच कुलाबा ते सीप्झ या भुयारी मेट्रो स्टेशनला थेट तुमच्या घरातून आणि ऑफिसमधूनच प्रवेश मिळणार आहे. तुमचं कामाचं ठिकाण किंवा अगदी थेट तुमच्या राहत्या इमारतीमधून सुद्धा मेट्रो स्टेशनला प्रवेश मिळेल. याबाबत मेट्रो 3 प्रशासन म्हणजेच एमएमआरसीएलने काही दिवासंपूर्वीच लोकांचा प्रतिसाद जाणून घेतला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. तुम्हाला जाणून घेतल्यावर नवल वाटेल की आपल्या राहत्या इमारतीमधून मेट्रो स्टेशनला थेट जाता-यावं म्हणून अनेक बिल्डरांनीही याला पसंती दिली आहे. 6 मेट्रो स्टेशनला 13 बिल्डरांनी आणि कंपन्यानी पसंती दर्शवली आहे. ज्यात सगळ्यात जास्त वरळी स्टेशन, त्याखालोखाल बीकेसी स्टेशनला अधिक बिल्डर किंवा कंपन्यानी आपल्याला थेट प्रवेश मिळावा यात स्वारस्य दाखवलं आहे. न्यूज 18 लोकमतनं तुमच्यासाठी हा EXCLUSIVE आराखडा समोर आणला आहे. कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या राहत्या घरातून किंवा कार्यालयातून प्रवेश मिळणार आहे, हे आराखड्यात दाखवण्यात आलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बिल्डींगमधील बसमेंटमधून अंतर्गत भुयार थेट जवळच्या मेट्रो स्टेशनच्या कॉनकोर्स म्हणजेच प्लॅटफॉर्मच्या वरच्या मजल्यावर थेट नेवून सोडेल. किंवा 3 ते 4 इमारतींचा समुह किंवा कंपन्याच्या कार्यालयाच्या आवारातून थेट भुयार तुम्हाला घेऊन जाईल. यामध्ये फक्त रहिवासी किंवा कर्मचारी म्हणून फक्त तुमहालाच याचा वापर करता येईल. इतर सामान्य नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. त्यामुळे बाहेरच्या रस्त्यावरचं ट्रॅफिक चुकवत किंवा ऊन-पावसातून स्वत:ला सांभाळत जायची गरज राहणार नाही. अशा प्रकारच्या भुयारांना 1 मीटरमागे साधारण 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याबदल्यात त्या कंपनीला भुयारात स्वत:ची जाहिरातही करता येऊ शकेल. मिळणारा प्रतिसाद पाहता मेट्रो 3 प्रशासन त्या त्या स्टेशनसाठी हे थेट प्रवेश ठरवून लवकरच निविदा काढणार आहे. एमएमआरसीएलच्या योजना विभागाचे कार्यकारी संचालक यांच्या मते, 'मेट्रो 3 या भुयारी मार्गाने रोज 17 लाख प्रवासी प्रवास करतील, ज्यांच्या तिकिटावर बोजा पडू नये यासाठी आम्ही उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत विकसित करतोय. त्याचाच हा एक भाग असून लोकांनाही याचा फायदा होईल आणि त्या भुयारी मार्गात विकासक आपली जाहिरात देऊन त्यांनाही फायदा होईल. याचा खर्च साधारण 10 लाख रुपये प्रति मीटर असून यातील नेमक्या कोणत्या स्टेशनसाठी हा थेट प्रवेश देत येईल याचा आम्ही विचार करतोय.' कोणत्या स्टेशनसाठी...कोणत्या बिल्डर किंवा कंपन्यानी थेट प्रवेशासाठी रस दाखवला आहे? मेट्रो स्टेशन -- वरळी           प्रकल्प-- एचएसबीसी आर्टेझिया- के रहेजा सिमेन्स- के रहेजा              वंडरवॅल्यु-एचबीएस            ऑबेरॉय मेट्रो स्टेशन--बीकेसीप्रकल्प--टाटा कॉलनी-- डीबी वाधवा कॅपिटल- डीबी          वाधवा प्लॅटिनम--डीबी मेट्रो स्टेशन-- सायन्स म्युझियमप्रकल्प--जीजामाता- डीबी          टर्फ इस्टेट--डीबी मेट्रो स्टेशन- टर्मिनल 2 ( एअरपोर्ट)प्रकल्प- जे डब्ल्यू  मॅरीयट           शॅलेट हॉटेल            श्रेम फेअरमोंट मेट्रो स्टेशन- आचार्य़ अत्रे प्रकल्प-- इंडीया बुल्स ब्लू- ब्लॅकस्टोन मेट्रो स्टेशन- मरोळ नाका प्रकल्प-- वॉटरस्टोन्स हॉटेल या व्यतिरिक्त स्टेशनचं नामकरण करण्यासाठी लोकांच्या पसंती पाहण्यासाठी अर्ज मागवलइ ज्यात 18 स्टेशनसाठी 87 कंपन्या पुढे आल्या आहेत. तर एकट्या बीकेसी स्टेशनला आपलं नाव द्यावं यासाठी 12 कंपन्यांनी अर्ज केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published: