लॉकडाऊननंतर मुंबई मेट्रोमध्ये होणार मोठ बदल, असे असणार नियम

लॉकडाऊननंतर मुंबई मेट्रोमध्ये होणार मोठ बदल, असे असणार नियम

मुंबई मेट्रो सुरू करण्याचा विचारात सरकार आहे. यासाठी सार्वजनिक परिवहनकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे : कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात मार्चपासून राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर लोकल आणि मेट्रो पुर्णत: बंद करण्यात आल्या. दरम्यान लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यातच मुंबई मेट्रो सुरू करण्याचा विचारात सरकार आहे. यासाठी सार्वजनिक परिवहनकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मेट्रोचा वापर करताना सोशल डिस्टन्सिंगवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे.

गुरुवारी मुंबई मेट्रोनं (Mumbai Metro) वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील आपल्या ट्रेनचे फोटो टाकले. यावेळी प्रत्येक सीटवर स्टिकर लावले जात आहे. यामध्ये दोन सीटमध्ये अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळं लॉकडाऊननंतर मेट्रो सुरू झाल्यास एक-एक सीट सोडून प्रवाशांना बसावे लागणार आहे. यासाठी 16 रेकवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सामाजिक अंतर राखण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचा-देशात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, 24 तासांत 6088 नव्या रुग्णांची नोंद

वाचा-धक्कादायक! चीननंतर या देशाचा खोटारडेपणा उघड, तब्बल 19 हजार मृतांची माहिती लपवली

असे असणार मेट्रोचे नियम

मेट्रो वनमधील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सध्या मेट्रोच्या कोचमध्ये बसण्याची क्षमता 200 आहे, तर इतर 200 लोक उभे राहून प्रवास करू शकतात. नवीन प्रणालीमुळे क्षमता निम्म्याने कमी होईल. त्यामुळे आता प्रत्येक प्रवाश्यात 100 प्रवासी बसू शकतात आणि 75 प्रवासी उभे राहू शकतात. मुंबई मेट्रो वनमधून दररोज येणाऱ्यांची संख्या 3.8 लाख आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आहे. एकट्या मुंबईत 25 हजारपेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यामुळं मुंबई मेट्रो कधी सुरू होणार, याबाबत निर्णय घेण्याआधी कोरोना रुग्णांची संख्या कमी करणे महत्त्वाचे आहे.

वाचा-घर गाठण्यासाठी उपाशीपोटी 780 किमी चालला मजूर, 10 दिवसांनी समोर दिसलं घर पण...

First published: May 22, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या