Home /News /mumbai /

वेळापत्रक पाहून बाहेर पडा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

वेळापत्रक पाहून बाहेर पडा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा कारण मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

    मुंबई, 01 मार्च : मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा कारण मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी काही लोकलच्या वेळात्रकात बदल करण्यात आला आहे तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहे. रुळ, सिग्नल आणि इतर तांत्रिक कामांसाठी तिन्ही लोकल मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्गावर रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधीमध्ये धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. जलद मार्गावर मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण या मार्गावर लोकल थांबतील. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली स्थानका दरम्यान 10.35 ते 3.50 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही दिशेनं जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. हे वाचा : पत्नी पळून गेली प्रियकरासोबत, तिला शोधण्यासाठी पतीने केलं भयकंर कृत्य! ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी आणि नेरुळ दरम्यान लोकल सेवा सुरू असेल. तर सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान काही विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वडाळा, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकादरम्यान 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत एकही लोकल धावणार नाही. त्यामुळे मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहून बाहेर न पडल्यास मेगाहाल होण्याची शक्यता आहे. हे वाचा : Corona व्हायरसचे जगभरात 85,000 पेक्षा जास्त संशयित, 2900 लोकांचा मृत्यू
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Mumbai local

    पुढील बातम्या