आज मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'असं' आहे वेळापत्रक

आज मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'असं' आहे वेळापत्रक

आज जर तुम्ही कुठे जाण्याच्या विचारात असाल तर मेगाब्लॉकचं हे वेळापत्रक नक्की जाणून घ्या.

  • Share this:

25 मार्च : रविवार म्हटलं की मुंबईकरांसाठी मनस्ताप सहन करण्याचा दिवस असतो कारण नेहमीप्रमाणे या रविवारीही मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे  जर तुम्ही कुठे जाण्याच्या विचारात असाल तर मेगाब्लॉकचं हे वेळापत्रक नक्की जाणून घ्या.

हार्बर रेल्वे

- वाशी ते बेलापूर लोकल 8 तास बंद

- स. 10 ते संध्या. 6 पर्यंत ब्लॉक

- नेरुळ-उरण नव्या मार्गासाठी महत्वाची कामं

- ठाणे-पनवेल लोकल 8 तासांसाठी बंद राहणार

पश्चिम रेल्वे

- बोरिवली-भाईंदर दोन्ही स्लो मार्गांवर ब्लॉक

- स. 11 ते दु. 3 पर्यंत अभियांत्रिकी काम

- स्लो लोकल फास्ट ट्रॅकवरून धावणार

मध्य रेल्वे

- कल्याण-ठाणे अप स्लो मार्गावर ब्लॉक

- स. 11.20 ते दु. 4.20 पर्यंत ब्लॉक

- कल्याण-मुलुंड अप लोकल फास्ट मार्गावर

- ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवर लोकल थांबणार नाही

First published: March 24, 2018, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading