धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 27 मे : रविवार म्हंटलं की मुंबईकरांना रेल्वे प्रवासाचं मोठं टेन्शन असतं. उपनगरीय रेल्वेच्या कामांसाठी दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे अनेक गाड्या रद्द होतात. तसंच त्यांच्या मार्गातही बदल होतो. मात्र, उद्या (28 मे) रोजी रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर दिवसकालीन कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही. त्यामुळे दर रविवारी मेगाब्लॉकमुळे गर्दीचा सामना कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र रविवारी दिवसकालीन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लाॅक घेऊन रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरूस्ती केली जाणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
ट्रान्स हार्बर मार्ग
ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 04.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 04.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लाॅक नसेल.
यापेक्षा स्वस्त मुंबईतही कुठेच नाही! उगाच चिंधी मार्केट म्हणत नाही! डोंबिवलीतून GROUND REPORT
पश्चिम रेल्वे
माहीम ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लाॅक नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.