मुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधीच्या कामासाठी विशेष ब्लॉक असून हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही आज सहा तास बंद राहणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2018 10:40 AM IST

मुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक

मुंबई, 17 जून : मुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधीच्या कामासाठी विशेष ब्लॉक असून हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही आज सहा तास बंद राहणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय.दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी सहा तासांचा, तर परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी आठ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आलाय.

दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री १२ वाजून ४५ मिनिटे ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. तसेच विविध मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या. या ब्लॉकमुळे रविवारी पहाटेपासूनचन मध्य रेल्वेची वाहतून मंदावली होत. तसेच मुंबईकडे येणाऱ्या लोकल 30 ते 35 मिनिटे उशिराने धावत आहे.

परळ स्थानकात नव्या फलाटांकरिता रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेºया सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2018 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...