मुंबई, 06 जानेवारी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी महापौर किशोर पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने अर्वाच्च भाषेत शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझार मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती.
शिक्षक झाला नराधम, नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास हा फोन आला होता. समोरील व्यक्ती ही हिंदी भाषेतून बोलत होती. त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हा फोन शेजारील राज्यातून आल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच या व्यक्तीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
घरातील सोन्यावर व्याज मिळवण्याची संधी, सरकार या योजनेत बदल करण्याच्या तयारीत
मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी एकीकडे रणनीती आखली जात आहे. तर दुसरीकडे महापौरांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.