मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील पॉश सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याची भीती; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

मुंबईतील पॉश सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याची भीती; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत (hiranandani estate society) बोगस लसीकरण शिबीर घेण्यात आल्याच्या प्रकारावरून चांगलीच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 जून : कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत (hiranandani estate society) बोगस लसीकरण शिबीर घेण्यात आल्याच्या प्रकारावरून चांगलीच खळबळ उडाली आहे. सोसायटीतील नागरिकांना बोगस लस (Fake Vaccination Mumbai) दिली गेली असल्याचा आरोप करत लसीकरण घोटाळा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणात रुग्णालयांनी खुलासा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

यावर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, अशा घटनेची आम्हाला भीती होतीच. लसीकरणाची माहिती राज्यांकडे आणि त्या-त्या महापालिकांना मिळायला हवी, त्याची नोंद महापालिकांकडेही व्हायला हवी पाहिजे होती. पण, तसं होत नसल्यानं महापालिकेला लसीकरणाची अधिकृत माहिती मिळत नाही, त्यामुळं पालिकेला अशा घटनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. याबाबत आम्ही आता चौकशी करून अहवाल मागवला आहे.

30 मे रोजी हिरानंदानी सोसायटीमध्ये लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 490 नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. एकाने सोसायटीतील सदस्यांची भेट घेऊन स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं होतं. तसंच सोसायटीत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचं सांगितलं होतं. लसीकरणानंतर सर्वांकडून रोख पैसे घेतले होते. महत्त्वाचे म्हणजे लस देताना कोणालाही फोटो काढून न दिल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं, अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली होती.

हे वाचा - संतापजनक! पिंपरीत सख्ख्या भावाने केला बलात्कार; बहीण गरोदर राहिल्यानंतर उघड झाला प्रकार

लस दिल्यानंतर नागरिकांना लसीकरण झाल्याचा मेसेज आला नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या रुग्णालयांची प्रमाणपत्र देण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. सुरूवातीला नागरिकांना वेगवेगळ्या तारखा आणि ठिकाणं असलेली प्रमाणपत्र देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Mumbai