Home /News /mumbai /

चंद्रकांतदादा मी पण शिवसैनिक, मराठ्याची औलाद... किशोरी पेडणेकरांचा इशारा

चंद्रकांतदादा मी पण शिवसैनिक, मराठ्याची औलाद... किशोरी पेडणेकरांचा इशारा

उगाच डिवचण्याच्या प्रयत्न करु नका. तुमच्या वाटेला आम्ही येणार नाही. मात्र तुम्ही आमच्या वाटेला आलात तर आम्ही अजिबात सोडणार नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

    मुंबई, 24 जानेवारी : मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका करताना इशाराही दिला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर मी काहीही बोलणार नाही हे मी आधीच सांगितलं आहे. मात्र चंद्रकांतदादा जर बोलत असतील तर मी पण शिवसैनिक आहे. मराठ्याची औलाद आहे, माझ्यात पण एक मराठा लाख मराठा दौडतो. उगाच डिवचण्याच्या प्रयत्न करु नका. तुमच्या वाटेला आम्ही येणार नाही. मात्र तुम्ही आमच्या वाटेला आलात तर आम्ही अजिबात सोडणार नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. टीका करणाऱ्या विरोधकांची किव करावीशी वाटते. विरोधकांना खुले चॅलेंज जी आत्ता निविदा आलीय ती 92.52 कोटी आणि 94.42 कोटींची आहे. या किमतीत तुम्ही निविदा घेऊन या तुमचे स्वागत आहे. स्वीकारा आमचे चॅलेंज, असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना दिलं आहे. गुजरातमध्येही 264 कोटी खर्च पेंग्विनसाठी येत आहे. तेथे 6 पेंग्विन आणले होते आज तिथे 5 पेंग्विन आहेत. त्यातील एक पेग्विंन मृत झाला आहे. तिकडे पण नागरिकांचे पैसे आहेत ते योग्य खर्च होत आहेत का? असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. गेले आठवडाभर विरोधक राणी बागेच्या मुद्द्यावरुन निशाणा साधत आहेत. विरोधक आरोप करतायेत भ्रष्टाचार झालाय. मात्र भ्रष्टाचार झालाय तर तर सिद्ध करा. हात जोडून विनंती आहे आपण कायदे मानतो तुम्ही आरोप सिद्ध करा राजकीय, प्रशासकीय कोणीही असुदेत कारवाई केली जाईल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. आज विरोधी पक्ष कमी आणि वैरत्व जास्त आहे. राजकीय पातळी खाली जात आहे. अनेक तरुण मुले या राजकरणाला कंटाळले आहेत, असंही त्या म्हणाल्या.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Chandrakant patil, Kishori pedanekar, Shivsena

    पुढील बातम्या