मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची तब्येत बिघडली, छातीत दुखू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची तब्येत बिघडली, छातीत दुखू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल

किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 18 जुलै: मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांची प्रकृती बिघडली आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, चेंबूरमध्ये (Chembur Wall Collapsed) भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. तर विक्रोळीमध्ये (Vikhroli House Collapsed) एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील या घटनांमध्ये तब्बल 21 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

'घडलेल्या दोन्ही घटना दुर्दैवी आहे, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दु:ख व्यक्त केलं.

ऐकावं ते नवलच ! रिक्षा पोहोचली हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर

सकाळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नव्हते. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते, त्यावेळी त्याला विरोध केला जातो, असंही त्या म्हणाल्यात.

चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. तेथील नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलं होतं, असंही पेडणेकर यांनी सांगितलं.

...मग उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

पावसाच्या काळात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता तुम्ही पावसाच्या दिवसात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. दरवर्षी इतर ठिकाणीही लोकांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात येतं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे, असं महापौर म्हणाल्यात.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai