Home /News /mumbai /

धारावी कोरोनामुक्त होताच मुंबईच्या महापौरांनी लगावला RSS ला टोला

धारावी कोरोनामुक्त होताच मुंबईच्या महापौरांनी लगावला RSS ला टोला

सर्वांनी एकत्र ध्येयाने काम केल्यामुळेच धारावीमधील कोरोना संसर्ग कमी करता आला, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबई, 25 डिसेंबर : कोविड19 चा एकही रूग्ण धारावीच्या दाट लोकसंख्या असलेल्या वसाहतीत आज सापडला नाही. सर्वांनी एकत्र ध्येयाने काम केल्यामुळेच धारावीमधील कोरोना संसर्ग कमी करता आला, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसंच किशोरी पेडणेकर यांनी यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही टोला लगावला. मुख्यमंत्री, आयुक्त आणि धारावीकरांमुळे हा परिसर कोरोनामुक्त करण्यात यश मिळालं. संघाचे स्वयंसेवक कुठे दिसले नाहीत, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. महापौर पेडणेकर यांनी आज पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'धारावीतून कोरोना हद्दपार करण्यासाठी पहिल्यापासूनच मुंबई महापालिकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न सुरू केले होते. चतु:सुत्री जी राज्य शासनाने दिली होती, ती सर्वांनी राबवली. माझे कुटुंब माझी जबाबदारीचे पालन केले. यामध्ये धारावीमधील रहिवाशांचे खूप मोठे सहकार्य मिळाले. त्यामुळेच धारवीचं नाव जगामध्ये गेलं असून संघाचे कार्यकर्ते कुठे दिसले नाहीत व तसे असल्यास त्यांनी इतर ठिकाणी पुढे यावे,' असं किशोरी पडणेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धारावी परिसरात गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळला नाही. गेल्या एप्रिलनंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. 2.5 वर्गकिलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये 6.5 लाखांहून अधिक लोक वास्तव्य करतात. धारावीत एप्रिल महिन्यात पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली होती. एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 3788 वर पोहोचली होती. सध्या धारावीत 10 पेक्षाही कमी कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Mumbai, RSS

पुढील बातम्या