मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'...तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल', महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान

'...तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल', महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान

महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईतील वाढती गर्दी पाहता मुंबईकरांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान मुंबईच्या महापौरांनी दिलेली प्रतिक्रिया मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 16 फेब्रुवारी: कोरोनाच्या बाबतीत (Coronavirus) महाराष्ट्रातून समोर येणारी आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईतही पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशावेळी मुंबईकरांनी काळजी घेतली नाही तर त्यांना पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागू शकतो असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pedanekar) यांनी दिले आहेत.

काय म्हणाल्या महापौर?

कोरोना परिस्थितीबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर असे म्हणाल्या की, 'ही चिंतेची बाब आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक मास्क (Mask) घालत नाहीत. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपण दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशने जाऊ. लॉकडाऊन पुन्हा लागू करावा का नाही हे लोकांच्या हाती आहे.'

महापौर पुढे म्हणाल्या की, 'मुंबईकरांना हेच सांगणे आहे की आपल्याला लॉकडाऊन नको आहे. पण गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या वाढत आहे. नाईलाजास्तव लॉकडाऊन करावं लागेल अशी भीती राज्यसरकारने व्यक्त केली आहे.'

कोरोना लसीकरणाबाबत (Coronavirus Vaccination) बोलताना महापौर म्हणाल्या की आपल्याकडे अमेरिकेपेक्षाही जास्त लसीकरण झाले आहे. त्या ही लस घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच सर्वांनी लस घेतली पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळीच सोडवण्यात येतील अशीही माहिती पेडणेकर यांनी दिली.

लोकलबाबत होणार फेरविचार

मुंबईची लाईफलाइन समजली जाणाऱ्या लोकलची (Mumbai Local) सेवा कोरोना संसर्गामुळं (Coronavirus) गेल्या अनेक महिन्यापासून बंद होती. अशात फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र दिसल्यानं 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in Mumbai) पुन्हा एकदा वाढ होत असल्यानं लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत 22 फेब्रुवारीला आढावा घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

याविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की रूग्णांच्या संख्येत 10 ते 20 टक्के वाढ होत राहिल. मात्र, 22 फेब्रुवारीला होणाऱ्या आढावा बैठकीत रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निरीक्षणात आल्यास लोकलबाबत वेगळा निर्णय घेण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून त्यानंतर पावलं उचलली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, यात आणखी एक सकारात्मक बाजू अशी, की रूग्णसंख्या कमी झाल्याचं आढळल्यास आणखी शिथिलतेबाबतही निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BMC, Corona vaccine, Coronavirus, Kishori pedanekar, Lockdown, Mumbai, Mumbai muncipal corporation