खोट्या जात प्रमाणपत्रावरून मुंबईचे महापौरही वादात, RTI तून धक्कादायक खुलासा

खोटी जात दाखवून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झालेले आणि त्यानंतर खोटया जात प्रमाणपत्रामुळे काही नगरसेवकांनी आपलं पद गमावलं. पण आतापर्यंत एकाही नगरसेवकांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 08:36 PM IST

खोट्या जात प्रमाणपत्रावरून मुंबईचे महापौरही वादात, RTI तून धक्कादायक खुलासा

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई, 7 फेब्रुवारी : आरटीआयमधून मिळालेल्या नव्या माहितीमुळे मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 'विश्वनाथ महाडेश्वर यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध असल्याचं 2007 साली सिद्ध झालं होतं. पण त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,' अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जानंतर बाहेर आली आहे.

खोटी जात दाखवून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झालेले आणि त्यानंतर खोटया जात प्रमाणपत्रामुळे नगरसेवक पद गमावल्यावर एकाही नगरसेवकांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत एकही गुन्हा दाखल केला नाही. ही धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिका प्रशासनानेच दिली आहे.

आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सर्व खाती गुन्हा दाखल करण्याच्या जबाबदारीतून स्वतःला वेगळे करत आहेत. जेव्हा नगरसेवकांचे पद रद्द होते तेव्हा त्याच्या गुन्ह्याची कबूली असते मग अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे, असं लेखी पत्र अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्तांना पाठवलं आहे. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

प्रशासन संभ्रमात

Loading...

दोषी आढळलेल्या या नगरसेवकांवर गुन्हा कोण दाखल करणार याबाबत चिटणीस, विधी, आयुक्त आणि निवडणूक कार्यालयात संभ्रम आहे. त्यामुळे एकदुसऱ्यांवर जबाबदारी ढकलण्यात येत आहे. या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पालिका चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की, गेल्या तीन निवडणुकांत विविध कारणांमुळे ज्या नगरसेवक-नगरसेविका यांचे पद रद्द करण्यात आले आहे, त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचे विवरण देण्यात यावे. मुंबई पालिका चिटणीस खात्याने अनिल गलगली यांचा अर्ज विधी आणि निवडणूक कार्यालयास हस्तांतरित केला. विधी खात्यात सुद्धा दोन ठिकाणी गलगली यांचा अर्ज पाठवण्यात आला. कोणत्याही नगरसेवक किंवा नगरसेविकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती विधी खात्याचे उपकायदा अधिकारी अनंत काजरोलकर यांनी दिली आहे.

अनिल गलगली यांचा अर्ज निवडणूक कार्यालयात सुद्धा हस्तांतरित करण्यात आला होता. निवडणूक कार्यालयाने मागील तीन निवडणुकीत ज्यांचे पद रद्द करण्यात आले आहे अशा 21 लोकांची माहिती दिली. ज्यामध्ये 20 जण हे खोट्या जातीमुळे तर एकाचं पद हे दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे बाद झालं होतं. या 21 लोकांमध्ये मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे सुद्धा नाव आहे.


VIDEO : स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके, तरुणांनी घातला राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...