मुंबईवर होऊ शकतो हवाई हल्ला? शिवाजी पार्क प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

मुंबईवर होऊ शकतो हवाई हल्ला? शिवाजी पार्क प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई,24 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी 2020 रोजी शिवाजी पार्क, दादर येथे होणाऱ्या संचलन समारंभात दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी शिवाजी पार्क हवाई क्षेत्र उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले आहेत.

ड्रोन उड्डाणास बंदी..

ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत आजपासून दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत ड्रोनसारख्या उपकरणांच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे.

दहशतवादी अथवा राष्ट्रविरोधी तत्वांकडून जीवितास आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने ड्रोनसारख्या उपकरणांचा वापर हवाई हल्ल्यांसाठी होऊ शकतो. या कारणांमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका ठरु शकणाऱ्या बाबींना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून यानुसार पुढील महिनाभरासाठी बृहन्मुंबई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदी उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले

भाडेकरुंची माहिती पोलिस ठाण्यात देण्याचे आदेश..

बृहन्‍मुंबई पोलिस आयुक्तालयाचे आदेश बृहन्‍मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलिस ठाण्‍यात द्यावीत, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत.

दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहचण्याच्या शक्यता गृहित धरुन फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 च्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 10 (2) कलम जारी केले आहे. त्यानुसार आपल्याकडे भाडेकरु ठेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही घरमालकाने संबंधित भाडेकरुची संपूर्ण माहिती हद्दीतील पोलिस ठाण्यात सादर केल्याशिवाय आपले घर भाड्याने देऊ नये. तसेच भाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे.

विदेशी नागरिकास भाडेकरु म्हणून ठेवायचे असल्यास संबंधित विदेशी नागरिकाचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्र., पासपोर्ट दिल्याचे ठिकाण व तारीख, पासपोर्ट वैधतेची मुदत, व्हिसा क्र., वर्गवारी, दिल्याचे ठिकाण व तारीख, व्हिसा वैधतेची मुदत आदी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार कारवाईस पात्र राहील, असेही बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2020 07:19 PM IST

ताज्या बातम्या