मुंबई मॅरेथॉनमध्ये 3 धावपटूंना Heart Attack, एकाचा जागीच मृत्यू

मुंबई मॅरेथॉनमध्ये 3 धावपटूंना Heart Attack, एकाचा जागीच मृत्यू

कडाक्याच्या थंडीत मुंबई 17 व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 5.15 वाजता सुरुवात झाली होती. या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण 55 हजार 322 धावपटू सहभागी झाले होते.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : रविवारी आजोजित केलेल्या मुंबई मॅरेथॉन 2020मध्ये  धावताना हृदयविकाराच्या झटक्याने एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गजानन मालजलकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गजानन यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांना मृत झाल्याचं डॉक्टरांननी घोषित केलं.

मॅरेथॉनमध्ये धावण्याच्या वेळी इतर दोन धावपट्टूंना हृदयविकाराचा झटका आला. पण त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसर्‍याला व्यक्तीचा डिस्चार्ज झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये गजानन मालजलकर यांचा मृत्यू झाला आहे.

कडाक्याच्या थंडीत मुंबई 17 व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 5.15 वाजता सुरुवात झाली होती. या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण 55 हजार 322 धावपटू सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते वरळी डेअरी इथून अर्धमॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत गुलाबी थंडीत धावण्यासाठी मुंबईकरांनीही मोठा उत्साह दाखवला.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच, दोन हजार अतिरिक्त पोलिस, 600 वाहतूक पोलिस, 3 हजार स्वयंसेवक, 300 वॉर्डन तसेच राखीव पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

इतर बातम्या - छगन भुजबळांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, पहिल्याच बैठकीत रुद्रावतार

10K मॅरेथॉनची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) स्थानकापासून करण्यात आली. हजारो धावपटू शहरातून धावत वांद्रे-वरळी सीलिंक, मरीन ड्राईव्ह, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली आणि पेद्दार रोडवरून धावत गेले.

मुंबईत शनिवारी 12 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुलाबी थंडीमध्ये 55 हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये पोलीस, डॉक्टर, वेगवेगळ्या पदावरचे अधिकारीही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सकाळच्या वेळात वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये काही बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भातील माहिती ट्वीट करून दिली आहे.

42.195 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये 9 हजार 660 धावपटू, 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये 15 हजार 260 तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या 'ड्रीम रन'मध्ये 19 हजार 707 स्पर्धक, 10 किमी शर्यतीत 8 हजार 032, ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमध्ये 1 हजार 022 आणि अपंगांच्या शर्यतीत 1 हजार 596 धावपटू सहभागी झाले. गतवर्षीचे विजेते केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या वर्षी या दोघांनी मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान वेळेची नोंद केली होती.

इतर बातम्या - ब्युटी पार्लरमध्ये सुरू होती शरीर विक्री, पोलिसांनी 11 तरुणींना रंगेहात पकडलं

First published: January 19, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading