S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

चंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वरील बैठक संपली, सेनेनं घेतला 'हा' निर्णय

आज गटनेत्यांच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा अहवाल मांडण्यावर विरोधक ठाम राहिल्याने विधेयक मांडताना सरकारला अडचण येऊ शकते. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेले होते.

Updated On: Nov 27, 2018 10:26 PM IST

चंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वरील बैठक संपली, सेनेनं घेतला 'हा' निर्णय

उदय जाधव, प्रतिनिधी


मुंबई, 27 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाच्या विधेयकासाठी  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील 'मातोश्री'वरील बैठक संपली आहे. मराठा विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.मराठा आरक्षणासाठी विधेयक मांडण्यावर सरकार ठाम आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संध्याकाळी 'मातोश्री'कडे धाव घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास अर्धातास त्यांनी चर्चा केली.  या बैठकीत शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि नेते सुभाष देसाई उपस्थित होते.


मी गेल्या १५ दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही भेटलो. जे ५२ टक्के आरक्षण आहे त्याला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल यावर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही यावर सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी पाठिंब्या देण्याबाबत आश्वासन दिलं आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना काय सांगितलं.


१) मराठा समाज बांधवांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका

२) मराठा आरक्षण टिकणारं पक्क विधेयक बनवा

३) मराठा आरक्षणाची अंमलबजावणी ही तात्काळ करावी

४) इतर आरक्षण वर्गाला धक्का न लावता आरक्षण विधेयक आणावं

५) धनगर आणि इतर समाजाच्या न्याय मागण्यांसाठीही केंद्राकडे पाठपुरावा करून सकारात्मक प्रश्नं सोडवा.


मराठा आरक्षणाचा मागासवर्गाचा अहवाल मांडावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली मात्र, त्यात तोडगा निघू शकला नाही.  त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी पाटील यांनी 'मातोश्री' गाठली.


काल सोमवारी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी १६ टक्के देण्यास सरकार आग्रही आहे अशी माहिती दिली होती. तसंच 29 तारखेला पटलावर मांडण्यात येणारं विधेयक 30 तारखेपर्यंत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं होतं.


दरम्यान,मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. आम्ही स्वतंत्र आरक्षण देणार पण विरोधकांच्या मनात काळंबेरं आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्य सरकार जी काही कारवाई करत आहे ती नियमाने करत आहे. कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की, वार्षिक रिपोर्ट आणि अॅक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. विधेयक मांडण्याआधी सभागृहात एटीआर मांडण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.


 


================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close