Home /News /mumbai /

Mumbai : Online Instant Loan घेणं पडलं महागात, कर्ज घेतलं 5 हजारांचं अन् वसुली झाली 4.28 लाखांची

Mumbai : Online Instant Loan घेणं पडलं महागात, कर्ज घेतलं 5 हजारांचं अन् वसुली झाली 4.28 लाखांची

Online Loan घेणं पडलं महागात, कर्ज घेतलं 5 हजारांचं अन् वसुली झाली 4.28 लाखांची

Online Loan घेणं पडलं महागात, कर्ज घेतलं 5 हजारांचं अन् वसुली झाली 4.28 लाखांची

Instant Loan App: इन्स्टंट लोन घेणं मुंबईतील एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. 5000 रुपयांच्या कर्जासाठी त्याला तब्बल सव्वा चार लाख रुपये परत करावे लागले आहेत.

    मुंबई, 4 जून : ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमुळे (Online Payment) जितकी सोय झाली आहे तितकाच फसवणुकीचा धोकाही वाढला आहे. खरं तर याबद्दल तज्ज्ञ आणि पोलिसांकडून वारंवार खबरदारीचा इशारा दिला जातो. पण तरीही आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार होत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांतील ऑनलाईन फसवणुकीची दुसरी घटना उघडकीला आली आहे. मुंबईतील एका 28 वर्षांच्या तरुणानं एका मोबाईल ॲपवरून 5,000 रुपयांचं ऑनलाईन कर्ज (Online Loan From App) घेतलं होतं. व्याजासह त्यानं 8,200 रुपये परत केले; पण त्याच्याकडून वसूली अधिकारी म्हणजेच रिकव्हरी एजंट्सने (Recovery Agents) तब्बल 4.28 लाख रुपये उकळले आहेत. त्यासाठी त्याला अतोनात त्रास देण्यात आला. द इंडियन एक्सप्रेस ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. या संदर्भात मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये 2 जून 2022 रोजी FIR दाखल करण्यात आला आहे. हा तरूण किचन सुपरव्हायजर म्हणून काम करतो आणि त्याच्या बायकोच्या आजारपणावरील उपचारांसाठी मार्चमध्ये त्याला पैशांची खूप गरज होती. पण त्यावेळेस त्याला कोणीही मदत केली नाही. 28 मार्च रोजी त्याला मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) कॅश बस (Cash Bus) या नावाचं एक ॲप दिसलं. ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यासाठी त्याच्या फोनमधील गॅलरी, कॉन्टॅक्ट लिस्ट (Contact List) आणि लोकेशनचा ॲक्सेसही (Location Access) त्यानं दिला, अशी माहिती या तरुणानं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आहे. वाचा : हॉटेलमध्ये जेवले मग बाहेर येऊन तरुणाला संपवले, हत्येचा खळबळजनक VIDEO आला समोर त्याला त्याचा PAN (पॅन क्रमांक) कार्ड नंबर आणि आधार कार्डवरील (Aadhar Card) सविस्तर माहितीसह एक सेल्फीही देण्यास सांगण्यात आलं. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला एक मेसेज आला. त्याला 50,000 रुपये मिळतील आणि त्याला ते 90 दिवसांच्या आत परत करावे लागतील असं त्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. 50 हजारांऐवजी मिळाले 5000 त्यानं Yes या बटणावर क्लिक केलं. त्याला फक्त 5,000 रुपये मिळाले. हे पैसे त्याला एका आठवड्यात परत करायचे होते. “मला 50,000 रुपयांऐवजी फक्त 5,000 रुपयेच का मिळाले हे विचारण्यासाठी मी त्यांच्या कस्टमर केअरच्या नंबरवर फोन केला. पण मला काहीही उत्तर मिळालं नाही, ” असं या तरुणानं सांगितलं. जेव्हा तो पैसे परत करू शकला नाही तेव्हा त्याला त्रास (Harassment) देणं सुरु झालं. खरंतर या तरुणानं 2 एप्रिल रोजीच व्याजासह 8,200 रुपये परतही केले. पण त्यानंतरही त्याचा छळ कमी झाला नाही. वाचा : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, कंटाळेल्या MA च्या विद्यार्थिनीनं घरातच संपवलं आयुष्य अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी “मी सगळे पैसे परत केले आहेत, असं मी त्यांना वारंवार सांगितलं. पण ते अपडेट झालं नाही असं ते सतत फोन करून मला सांगत होते. त्यानंतर त्यांनी मला माझा एक मॉर्फ केलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवला आणि त्यानंतर मग मी ते सांगतील तसे पैसे त्यांना पाठवत राहिलो. पण त्यानंतरही ते वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून मला माझे अश्लील फोटो पाठवत राहिले. हे सगळे अश्लील फोटो आणि व्हिडिओ माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्यांना आम्ही पाठवू अशी धमकी ते मला देत होते,” असं या तरुणानं पोलिसांना सांगितलं. या तरुणाला त्रास देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या नंबरवरून हे फोटो पाठवण्यात आले ते 20 नंबर या तरुणानं पोलिसांना दिले आहेत. त्याला वेगवेगळ्या नंबरवरून जवळपास 200 ते 250 घाणेरडे मेसेजेस करण्यात आले आहेत. त्याच्या खिशातून जवळपास 1.5 लाख रुपयेही गेले असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. आपल्याकडचे पैसे संपले आहेत असं या तरुणानं सांगितलं. तेव्हा कर्ज देणारे आणखी एक ॲप डाउनलोड करून आपले पैसे देण्याचा सल्ला या फसवणूक करणाऱ्यांनी या तक्रादार तरुणाला दिला. वाचा : तरुणाला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले, अमरावतीमधील धक्कादायक प्रकार अखेर पीडिताने पोलिसांत घेतली धाव या तरुणानं कर्ज फेडण्यासाठी अन्य लोन ॲप्स डाउनलोड केली. आपल्याला होणारा त्रास थांबवण्यासाठी त्यानं फसवणूक करणाऱ्यांना, धमकी देणाऱ्यांना तब्बल 4.28 लाख रुपये दिले. जेव्हा तो आणखी पैसे देऊ शकला नाही तेव्हा या फसवणूक करणाऱ्यांनी त्याचे अश्लील फोटो त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या लोकांना पाठवायला सुरुवात केली. या तरुणाला बराच सामाजिक त्रास सहन करावा लागला आणि शेवटी त्यानं पोलिसांकडे जायचं ठरवलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. “माझ्या कामाच्या ठिकाणी आणि माझ्या बॉसलाही त्या लोकांनी माझे अश्लील फोटो पाठवले. माझं डोकं काम करत नव्हतं. मला अक्षरश: आत्महत्या करावी असं वाटत होतं. मला फक्त ही छळवणूक थांबवायची होती. मी सतत दबावाखाली त्यांना पैसे देत होतो. अशा प्रकारच्या त्रासामुळे आणखी एका व्यक्तीनं आत्महत्या केली असं मी कुठेतरी वाचलं आणि मग मी धाडस  करून पोलिसांकडे गेलो. त्या लोकांनी माझे अश्लील फोटो माझ्या गर्भवती बायकोलाही पाठवले होते. ती या सगळ्या प्रकारामुळे खूप घाबरली होती. मला अजूनही त्यांचे फोन येतात. पण मी आता माहिती नसलेल्या नंबरवरून आलेले फोन घेत नाही,” अशी माहिती आपलं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर या तरुणानं द इंडियन एक्सप्रेसला दिली. वाचा : कुत्र्याच्या मृत्यूनंतर मालकाला बसला धक्का; पोलीस ठाणं गाठलं अन्.., अजब प्रकरण दोन महिन्यांत 47 तक्रारी अशा प्रकारे ॲप्सवरून फसवणूक केल्याच्या 47 तक्रारी मार्च-एप्रिल महिन्यात मुंबई पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत. पण त्यापैकी आतापर्यंत फक्त एकाच केसचा ते छडा लावू शकले. गेल्या संपूर्ण वर्षभरात अशा प्रकारच्या 42 केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्त पाचच केसेसचा तपास लागू शकला होता. अशा प्रकारच्या शेकडो घटना घडत असतात पण पीडित FIR नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत,असं मुंबई पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पैशांची कितीही गरज असली तरीही कोणत्याही परिस्थितीत अशा ऑनलाईन ॲप्सवरून कर्ज घेऊ नका. तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टचा ॲक्सेसही कुणाला देऊ नका. आपली फसवणूक झाली आहे असं लक्षात आलं की तातडीने पोलिसांकडे जा. तक्रार नोंदवा.
    First published:

    Tags: Crime, Instant loans, Mumbai

    पुढील बातम्या