Home /News /mumbai /

पार्सल न मिळाल्याने मुंबईकर तरुणाने थेट Jeff Bezos यांना केला खरमरीत मेल, त्वरित कारवाईनंतर मिळाला पूर्ण रिफंड

पार्सल न मिळाल्याने मुंबईकर तरुणाने थेट Jeff Bezos यांना केला खरमरीत मेल, त्वरित कारवाईनंतर मिळाला पूर्ण रिफंड

मुंबईमधील ओंकार हणमंते या व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या डिलिव्हरीसंबंधी थेट Amazon चे सीईओ जेफ बेझोस यांना ईमेलच्या माध्यमातून मदत मागितल्यानंतर त्याला तात्काळ पैसे परत मिळाल्याची घटना घडली आहे.

    मुंबई, 18 ऑक्टोबर : जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी असणारी अॅमेझॉन (Amazon) ग्राहकांना उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचे CEO जेफ बेझोस (Jeff Bezos) देखील ग्राहकांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली. मुंबईमधील ओंकार हणमंते या व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या डिलिव्हरीसंबंधी जेफ बेझोस यांना ईमेलच्या माध्यमातून मदत मागितल्यानंतर त्याला तात्काळ त्याचे पैसे परत मिळाले आहेत. असे घडले की ओंकार हणमंते नावाच्या मुंबईकराने आपल्या आजीसाठी नोकियाचा बेसिक मॉडेल असणारा फोन Amazon वरून ऑर्डर केला होता. पण हा मोबाईल त्याला न मिळता वेबसाइटवर डिलिव्हर झालेला दिसत होता. त्यानंतर त्याने यासंबंधी थेट Amazon चे सीईओ जेफ बेझोस यांच्याकडे मदत मागितली. त्याने ई-मेल करत यासंबंधी माहिती बेझोस यांना दिली. मुख्य म्हणजे बेझोस यांनी हा मेल त्यांच्या कस्टमर केअर एक्झिक्युटीव्हकडे पाठवला. त्यानंतर तत्काळ कंपनीने या व्यक्तीशी संपर्क साधत त्याच्या शंकांचे निरसन केले. त्याचबरोबर त्याने दिलेले पैसेदेखील त्याला परत देण्यात आले. (हे वाचा-SBI अलर्ट! अजिबात करू नका या 5 चुका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे) या तरूणाला त्याने मागवलेला फोन डिलिव्हर झाला नव्हता तरीही Amazon वर त्याची डिलिव्हरी झाल्याचे दाखवत होते. हा फोन त्याच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचला होता म्हणजेच डिलिव्हरी बॉयने ओंकारच्या बिल्डिंगच्या गेटवरच ते पार्सल सोडलं होतं. सीसीटीव्ही फुटेजनुसार ते त्याठिकाणाहून चोरी झाल्याचे दिसले. यात कंपनीच्या डिलिव्हरी बॉयची चूक असल्याने त्यांनी कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडे रिफंडची मागणी केली. पण त्याला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने थेट जेफ यांना मेल केला. ओंकारने मेलमध्ये असं काय लिहिलं की खुद्द जेफ बेझोस यांनी घेतली दखल? ''हाय जेफ आशा करतो की तुम्ही ठीक असाल. मी तुमच्या कस्टमर सर्व्हिस आणि डिलिव्हरी प्रोटोकॉलबाबत खूप निराश झालो आहे. मी Amazon वरून एक फोन ऑर्डर केला हो, जो मला मिळाला नाही. फोन डिलिव्हरी वेळी सोसायटीच्या गेटवर ठेवण्यात आला, जो त्याठिकाणाहून चोरी झाला आहे. मला डिलिव्हरीसाठी कोणता कॉलही आला नाही. यानंतरही तुमच्या कस्टमर सर्व्हिस टीमचे असे म्हणणे आहे की या प्रकरणाचा तपास होत आहे. हाच त्यांचा स्टँडर्ड रिप्लाय आहे, जसे की एखाद्या बॉटशी बोलतो आहे. खाली दिलेल्या लिंकमध्ये  मी सीसीटीव्ही फुटेज देखील दिले आहे. हे प्रकरण माझ्यासाठी निराशाजनक आहे आणि यानंतर या वेबसाइटवरून एखादी गोष्ट खरेदी करण्याआधी मी कमीतकमी दोन वेळा विचार करेन.'' (हे वाचा-जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण! Kalrock-Murari Lal Jalan असणार नवे मालक) ओंकारच्या अशा खरमरीत शब्दातील मेलनंतर जेफ बेझोस यांनी तत्काळ गोष्ट कस्टमर एक्झिक्युटिव्हकडे सोपवली. त्यानंतर कंपनीने हणमंतेचे पैसे खात्री केल्यानंतर परत केले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या