भर दिवसा मुंबईत हत्या, राजकीय वैमनस्यातून चाकूने संपवलं

भर दिवसा मुंबईत हत्या, राजकीय वैमनस्यातून चाकूने संपवलं

एका 40 वर्षाच्या व्यक्तीची 3 अज्ञातांनी हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलच्या मागे भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे : मुंबईच्या घाटकोपर पूर्वेला भर दिवसा एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. एका 40 वर्षाच्या व्यक्तीची 3 अज्ञातांनी हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलच्या मागे भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बबलू दुबे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. राजकीय वैमनस्यातून दुबे यांची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घाटकोपरच्या जागृती नगरमधील मेट्रो स्थानकाजवळ हा प्रकार झाला आहे. 3 अज्ञातांनी चाकूने सपासप वार करत दुबे यांची हत्या केली.

घटना झाल्यानंतर स्थानिकांनी दुबे यांना तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही सगळी घटना घडली तेव्हा संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण होतं. संपूर्ण स्थानकात प्रवाशांची धावपळ सुरू झाली होती.

हेही वाचा : रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, दुबे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईसारख्या शहरात जर भर दिवसा अशा पद्धतीने हत्या होत असेल तर मुंबईकरांचा जीव धोक्यात आहे अशी भीती सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईकरांची सुरक्षा राम भरोसे आहे असंच म्हणावं लागेल.

VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

First published: May 20, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading