Home /News /mumbai /

Mumbai: लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला अन्... थरारक घटना CCTV मध्ये कैद

Mumbai: लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला अन्... थरारक घटना CCTV मध्ये कैद

लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला अन्... अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला अन्... अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवेश करताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. दादर रेल्वे स्थानकात ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन (Mumbai Local Train)मध्ये चढताना किंवा लोकलमधून खाली उतरताना तोल गेल्याने अनेकदा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. प्रवाशांना नेहमीच घाई न करता ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचं किंवा ट्रेनमधून खाली उतरण्याचं आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत असतं. मात्र, असे असतानाही अनेकदा नागरिक घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. आता असाच एक प्रकार मुंबईतील दादर रेल्वेस्थानकातून (Dadar Railway Station) समोर आला आहे. (Man fall down while boarding local train in Mumbai shocking video) लोकल ट्रेनमध्ये चढताना एका इसमाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात हा प्रकार घडला. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या तिकीट तपासणीसने या इसमाच्या मदतीला धाव घेत त्या व्यक्तीला बाजूला खेचले. तिकीट तपासणीच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दादर रेल्वे स्थानकात वरिष्ठ तिकीट तपासणीस असलेले नागेंद्र मिश्रा हे नेहमीप्रमाणे आपले कार्य करत होते. ते ज्या प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणीसचं काम करत होते त्या प्लॅटफॉर्म शेजारी एक लोकल ट्रेन आली. या लोकलमध्ये एक प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला. नागेंद्र मिश्रा यांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ त्या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली. नागेंद्र मिश्रा यांनी त्या प्रवाशाला लोकल ट्रेनपासून दूर खेचले आणि त्याचे प्राण वाचवले. वाचा : मुंबईत 1500 रुपयांत Corona लसीकरणाचे Fake सर्टिफिकेट, टोळीचा पर्दाफाश काही आठवड्यांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी एक महिला खाली कोसळली त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्या महिलेचा जीव वाचवला. मुंबईतील सँडहर्स्ट रेल्वे स्थानकावर ही घटना घडली होती. ट्रेनमध्ये चढताना एक 50 वर्षीय महिला खाली कोसळली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला होता. त्या व्हिडीओत दिसत होते की, एक 50 वर्षीय महिला कशाप्रकारे ट्रेनमध्ये चढताना खाली कोसळली. त्यावेळी तेथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवानांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत त्या महिलेचे प्राण वाचवले. लाटेच्या तडाख्याने बोटीतून समुद्रात पडली महिला,मुंबई पोलिसांनी वाचवला जीव अस्मानी संकट असो अथवा कोरोनाचे संकट असेल मुंबई पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडत असतात. आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात अशीच एक थरारक घटना घडली. पाण्यात बुडणाऱ्या एका महिला पर्यटकाला पोलिसांच्या पथकाने वेळीच वाचवले, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका दिव्यांग व्यक्तीला मुंबई वाहतूक पोलीस रस्ता ओलांडण्यास मदत करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा दक्ष मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local, Shocking viral video

    पुढील बातम्या